Youth celebrated 'Friendship Day' on Sunday. A young woman celebrating the day by tying a 'friendship band' with her friends esakal
नाशिक

Friendship Day 2023: तरुणाईची धमाल..! ‘फ्रेंडशिप डे’ला विविध दालनांमध्ये ऑफर, मिसळीवरही ताव

सकाळ वृत्तसेवा

Friendship Day 2023 : मित्र-मैत्रीण आपल्या तरल नात्याचा, मौल्यवान बंधाचा आणि मैत्रीचा सन्मान करण्यासाठी तरुणाईने धमाल केली. रविवारी (ता. ६) ‘फ्रेंडशिप डे’निमित्त विविध दालनांमध्ये ऑफर्स पाहायला मिळाल्या.

मिसळीवर ताव मारण्यासाठी तरुणाईने रेस्टॉरंटकडे धाव घेतली. दिवसभर शहरातील विविध रेस्टॉरंट फुल होते. (Friendship Day 2023 Youthful Excitement Offers in various galleries misal nashik)

फ्रेंडशिप बँडसह की-चेन, टेडी बेअर, फोटोफ्रेम, चॉकलेट बॉक्स, फ्रेंडशिप वॉच अशा विविध भेटवस्तूंच्या खरेदीसाठी दालनांमध्ये गर्दी कायम होती. व्यावसायिकांनी ‘फ्रेंडशिप डे’निमित्त ऑफर्स ठेवल्याने गर्दी वाढली.

सर्वांच्या स्टोरी आणि सोशल मीडियावर फक्त शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ वयोगटातील मित्रांनी प्रत्यक्ष भेटून, सोशल माध्यमावर शुभेच्‍छा दिल्या. त्यात चारोळ्या, फोटो, शुभेच्छा संदेश यांचा समावेश होता.

विविध रंगांतील फ्रेंडशिप रिबिन्स, ब्रेसलेट एकमेकांना बांधण्यात आल्या. धकाधकीच्या जीवनात नोकरीनिमित्त वेळात वेळ काढून आलेल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता तरुणाईच्या चेहऱ्यावर दिसून आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निसर्ग पर्यटनावर भर

रविवार सुटीचा दिवस असल्याने गंगापूर धरण, सोमेश्वर धबधबा, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी आदींसह नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळी मित्र-मैत्रिणींच्या समूहाने नियोजन केले होते.

निसर्ग पर्यटनावर मित्र-मैत्रिणींचा भर असल्याचे दिसले. शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोडसह उपनगरांतील विविध भागातील रेस्टॉरंटमध्ये फ्रेंडशिप डेनिमित्त सुविचार लावत भिंती सजविल्या होत्या. मिसळसह विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या समूहाची गर्दी होती.

"‘फ्रेंडशिप डे’निमित्त नोकरीनिमित्ताने भेटत नसलेले मित्र आज एकत्र आले. दिवसभरात मैत्रिणींची भेट घेत मिसळीचे नियोजन केले होते."- प्रियंका कोकणी, तरुणी

"फ्रेंडशिप डेनिमित्त मैत्रिणींना वेळात वेळ काढून भेटले. फ्रेंडशिप बँड बांधून मिसळीचे नियोजन केले होते." - कविता ठाकूर, तरुणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

T20I World Cup 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारतातील 'या' शहरांमध्ये रंगणार सामने; पाकिस्तानविरुद्ध मॅच कधी?

SCROLL FOR NEXT