petrol pump Sakal
नाशिक

सटाण्यात पेट्रोल पंपावर चोरून सरसकट इंधन विक्री

लॉकडाउन काळात कुणीही विनाकारण बाहेर पडून संसर्ग पसरवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे.

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा-देवळा रस्त्यावरील मोरेनगर शिवारातील एका पेट्रोलपंपावर शासनाचे नियम धाब्यावर बसवत सरसकट सर्वच वाहनांना पेट्रोल-डिझेलची विक्री करताना पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सटाणा पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. १७) धाड टाकून कारवाई केली आणि पंपावरील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी लॉकडाउन (Lockdown) काळासाठी पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठ्यासाठी सुरू राहतील, असे आदेश दिले आहेत. (Fuel is being sold to all vehicles at petrol pumps in Satna)

त्यानुसार सटाणा पोलिसांतर्फे सर्व पेट्रोलपंपचालकांना यासंदर्भात नोटिसांद्वारे सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील काही पेट्रोलपंप प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट सर्वच वाहनांना पेट्रोल-डिझेलची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी मोरेनगर शिवारातील एका पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी पोलिस कर्मचारी योगेश गुंजाळ, अशोक चौरे आणि विजय वाघ यांच्या पथकाचे डमी खासगी वाहन पाठविले. पंपावरील कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाकडून कोणत्याही प्रकारचा पास, ओळखपत्र अथवा दवाखान्याच्या कागदपत्रांची पडताळणी न करता डिझेल विक्री करतांना रंगेहाथ पकडले. या कर्मचाऱ्यांविरोधात सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


लॉकडाउन काळात कुणीही विनाकारण बाहेर पडून संसर्ग पसरवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनी अधिकृत ओळखपत्र आणि कागदपत्रे घेऊनच घराबाहेर पडावे. तसेच पेट्रोलपंपचालकांनीही ओळखपत्र व कागदपत्रांची पडताळणी करूनच इंधन द्यावे अन्यथा कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

(Fuel is being sold to all vehicles at petrol pumps in Satna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT