arrested along with 2 village kattas esakal
नाशिक

Nashik Crime: शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणारा फरार द्राक्ष व्यापारी 2 गावठी कट्ट्यांसह अटकेत

दिगंबर पाटोळे

Nashik Crime : दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला शिवारात परप्रांतीय द्राक्ष व्यापा-याने फेब्रुवारी महीन्यात सहा शेतक-यांचा द्राक्ष माल खरेदी करून शेतक-यांना कोणतेही चेक अगर पैसे न देता ४२ लाख १९ हजार ०५२ रूपये किंमतीची आर्थिक फसवणूक केली होती.

सदर बाबत हस्तेदुमाला येथील शेतकरी गणेश बबनराव महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Fugitive grape trader who cheated farmers out of lakhs arrested along with 2 village kattas Nashik Crime)

सदर गुन्हयातील आरोपी नामे मोहम्मद अन्दर शाह, वय ४५, रा. सीतामढी, राज्य बिहार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपी हा बिहार, गुजरात राज्य तसेच मुंबई शहरात आपले अस्तीत्व लपवून वास्तव्य करत होता.

वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश बोडखे यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपीचा मागोवा काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने आरोपीचे सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीय माहीती काढून तो कल्याण तालुक्यातील बनेली गाव परिसरात असल्याचे खात्रीशीररित्या समजले.

सदर माहीतीप्रमाणे पोलीस पथकाने कल्याण तालुका परिसरात स्थानिक पोलीसांचे मदतीने वरील गुन्हयातील फरार आरोपी नामे मोहम्मद अन्वर शाह यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कब्जात ०२ गावठी कट्टे मिळून आले असून त्याचे विरुध्द कल्याण तालुका पोलीस ठाणे गुरनं ३९२ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर गुन्हयात नमूद आरोपी हा कल्याण जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असल्याने मा. न्यायालयाकडून त्याचा ताबा घेऊन त्यास वणी पोलीस ठाणेकडील फसवणूकीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

त्यास मा. दिंडोरी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची २८/०६/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोउनि श्री प्रविष उदे हे करत आहे.

सदर गुन्हयाचे तपासात नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग श्री. पुष्कराज सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे वणी पो.स्टे. वे सपोनि श्री. निलेश बोडखे, पोउनि प्रतिष उदे, पोना कुणाल मराठे, पोकॉ राहुल आहेर तसेच स्थागुशाचे पोना हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन कामगिरी केली आहे.

पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास १0,000/- रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT