woman-crying.jpg 
नाशिक

धक्कादायक! पोलीस पत्नीवर अत्याचार प्रकरणी संशयिताच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त?? पोलिस ठाण्यातील कुजबुज

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) खुर्जल मळ्यात राहणाऱ्या संशयित व्यक्तीची तिथल्या महिलेशी ओळख झाली होती...पतीला व मुलाला मारण्याची धमकी आणि याचाच गैरफायदा घेत त्याने धक्कादायक प्रकार केल्याची बाब उघडकीस आली होती. पोलिसाच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यातही कारवाई होत नसल्याने, यातील संशयीतावर राजकीय वरदहस्त आहे, की कोणी खास आहे? अशी कुजबुज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांत आहे. सविस्तर प्रकार असा की...

पोलिसांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणारेच मोकाट

पोलिसाची बदली करण्याचे आमिष दाखवून खर्जुल मळा परिसरात त्याच्या पत्नीवर अत्याचार करणारा संशयित गोरख खर्जुल अद्याप मोकाटच असून, अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. पोलिसांच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणारेच पोलिसांना सापडत नसतील, तर सामान्यांवरील अन्यायाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 
सिन्नर फाटा परिसरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत शनिवारी (ता. 16) गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होण्याच्या घटनेला पाच दिवस उलटून गेले आहेत. मुळात काही दिवसांपासून नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या कामकाजाबाबत तसेच बंदोबस्ताच्या निमित्ताने पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांवरून नाशिक रोड पोलिस चर्चेत आहेत. 

राजकीय वरदहस्त 

संशयित गोरख खर्जुल हा सिन्नर फाटा भागातील शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेच्या कुटुंबातील आहे. विविध निवडणुकांच्या काळात सिन्नर फाटा व परिसरातील निवडणुकीच्या कामकाजाची सूत्रे तोच हाताळत असल्याने त्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत ऊठबस आहे. यापूर्वी त्याने दिल्लीतही गोंधळ घातला होता. 
खर्जुलने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर संसदेच्या आवारात हल्ला करण्याचा स्टंट केला होता. गल्ली ते दिल्ली सगळीकडे गोंधळाचे प्रकार केलेल्या संशयिताने पोलिस पत्नीवर अत्याचारच केलेला नाही तर पतीच्या बदलीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली आहे. 

पोलिस भूमिका संशयात

महिलेला धमकावणे व अश्‍लील फोटो, चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. राजकीय वरदहस्तामुळे संशयित गोरख खर्जुल पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करायचा का? तसेच नाशिक पोलिसांच्या बदल्यांत राजकीय पदाधिकारी हस्तक्षेप करतात का, असाही प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने पुढे आला आहे. त्यामुळेच फरारी संशयिताच्या बेपत्ता होण्यामागे पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Temperature : पुण्यात पुढील दोन दिवस तापमान राहणार स्थिर

काही पण... हा काय 'Peanuts in Coke’ चा ट्रेंड? सोशल मीडियावर Viral Video

Latest Marathi News Live Update : कल्याण ते टिटवाळा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड

IPL 2026 : महेंद्रसिंग धोनीसमोर ठेवली गेलीय अट; CSK आधीच अडचणीत सापडलाय, त्यात हे नवं प्रकरण; डेवॉल्ड ब्रेव्हिसबाबतही अपडेट्स...

‘नाम शबाना’नंतर ‘गांधारी’मधून दमादर भूमिकेत तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात कमबॅक

SCROLL FOR NEXT