death  esakal
नाशिक

सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा

कोरोनाबाधीत महिलेवर अंत्यसंस्कारासाठी घेतले दहा हजार रुपये

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : सर्व जगावर कोरोना महामारीचा फेरा फिरत असतांना कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कारासाठी हात लागत नाही. मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि हुंदकाही काढता येत नाही. की हंबरडा फोडता येत नाही. मृताच्या घरी चिंतनीय परिस्थीती निर्माण होत सर्वांच्या डोळ्यातील पाणीच जणू आटले कुणालाही हळहळ वाटावी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र ओझर येथे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडत आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय झाली असून काहींनी मदतकार्याच्या नांवाखाली गोरखधंदा सुरू केल्याचा निंदनिय प्रकार घडत आहे.

खरोखर येथे ओशाळला मृत्यु हेच खरे !

ओझर सध्या कोरोना हॉटस्पॉट बनत आहे. त्यावर उपाय म्हणून व्यापारी वर्गाने स्वयंघोषित जनता कर्फ्यू हा उपाय शोधला. पॉझिटिव्हची रुग्णसंख्या ३११५, नवीन रुग्णसंख्या दरदिवशी पन्नासच्यावर, तर सत्तरीच्या वर अॅडमिट करावे लागत आहे. सहाशेच्या वर क्वारंटाईन तर आत्तापर्यंत ६९ जण कोरोनाचे बळी गेले. तरीही माणसातील सजगता जागृत झाली नाही. एकीकडे या काळात अनेक समाजसेवक, संस्था, आरोग्य, पोलीस प्रशासन व संवेदनशील माणसं कोरोना महामारीत तन-मन-धनाने आपले योगदान देत आहेत. मात्र, काही जण 'मृतांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचा संस्कृतीला लाजवेल असा निर्दयी प्रकार ओझर येथे उघडकीस आला आहे. यामुळे पैशासाठी माणसाच्या संवेदना किती बोथट झाल्या याचा प्रत्यय आला आहे. पैशाच्या हव्यासासाठी माणसातील माणुसकीच हरवल्याच आणि खरोखर येथे ओशाळला मृत्यु हेच खरे !

प्रशासनाने चौकशी करून कडक कारवाईची मागणी

ओझर येथील एका कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही युवकांनी तब्बल दहा हजार रुपये घेतले. तर दुसऱ्या घटनेत हद्यविकाराने निधन झालेल्या एका वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही त्याच युवकांनी पाच हजार रुपये घेतले. आणि भावनेच्या भरात मृतांच्या नातेवाईकांनीही देऊन टाकले.अशाप्रकारे पैसे घेऊन अंत्यसंस्कार करणाऱ्या युवकांची प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तब्बल पाच दहा हजार रुपये

ओझर शहरात (दि. १७ एप्रिल रोजी ) दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला. यात एक इसमाचा मृत्यू हद्यविकाराने झाला, तर दुसरा एका महिलेचा कोरोनाने, सध्या ओझर हे कोरोना हॉटस्पॉट असल्याने अंत्यविधीसाठी जवळचे नातलग ही जाण्याचे टाळत आहेत. त्यात कोरोनाने मृत्यू झाला असल्यास आप्त नातलगदेखील खांदा दयायचे सोड त्याकडे भयापोटी पाठ फिरवत आहेत. याचा फायदा घेत येथील स्मशानभूमी परिसरात राहणाऱ्या युवकांनी माणुसकीला काळीमा फासेल असा गोरखधंदाच उघडला असून, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल पाच दहा हजार रुपये घेत आहेत.एकीकडे सद्या कोरोनामुळे जनता भयभित झाले आहे तर डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

समस्या कुणाला सांगायच्या?

ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना फवारणी तरी करायचे? चार डास निर्मुलन फवारणी यंत्र असूनही फवारणी का करत नाही ? वाढत्या डासांमुळे डेंग्यु, मलेरियासारखे रोग पसरू नये म्हणून प्रशासनाने बघ्याची भुमिका न घेता कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगरपालीका लागल्यापासून समस्या कुणाला सांगायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासका पेक्षा नगर परिषदेवर कार्यक्षम सक्षम अधिकाऱ्याची नेमणुक करावी. अशी मागणी समस्या ग्रस्त नागरिकांनी केली आहे.

ओझर येथे स्मशानभुमीत घडतेला प्रकार हा निंदनिय असून कोरोना बाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी कोणत्याही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची नेमणुक केलेली नाही. या काळात एकमेकांना आधार देण्याची, आणि मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. अंत्यसंस्कारासाठी कुणी पैशाची मागणी करत असेल तर नगरपरिषद कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा.- शरद घोरपडे, तहसिलदार तथा प्रशासक ओझर नगर परिषद

अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणे हा प्रकार निंदणीय आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. पैसे घेऊन अंत्यसंस्कार करणाऱ्यांची प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. व शासनाने आपतकालीन परिस्थितीत शवदाहिनीची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.- राजेंद्र शिंदे माजी सरपंच ओझर ग्रामपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

Jio offers: जिओ ग्राहकांना खुशखबर! 35 हजार रुपयांची मोफत सेवा मिळणार; सुरुवातीला 'याच' ग्राहकांना फायदा

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Latest Marathi News Live Update : आरोग्य विभागाच्या शासकीय निधीत अपहार

SCROLL FOR NEXT