Ganesha Picture on Thailand postage stamp & Indonesian Currency esakal
नाशिक

गणरायाचे Thailandचे तिकीट अन् Indonesiaच्या नोटेवर गणपतीची मुद्रा

आनंद बोरा

नाशिक : गणरायाचे हर्षोल्हासात आज आगमन होताच कुटुंबांमध्ये चैतन्य अवतरले आहे. नाशिकमधील निसर्ग टपाल तिकिटांचे संग्राहक रवींद्र वामनाचार्य यांच्याकडे तिकीटांवरील गणरायाचा अनोखा संग्रह आहे.

ते गेल्या ३५ वर्षांपासून टपाल तिकीटांचा संग्रह आहे. त्यांच्या संग्रहात थायलंड सरकारच्या तिकिटावरील गणराय अन इंडोनिशायामधील चलनी नोटेवरील गणरायाची मुद्रा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेते. (Ganesaha picture on Thailand postage ticket ganesh mudra on Indonesian currency Nashik Latest Marathi News)

गणरायाचा मोदक, तिरुपती बालाजीचा लाडू, जगन्नाथपुरीचा नैवेद्य वरण-भात, मथुरेचा पेढा

भारतीय टपाल विभागाने २०१७ मध्ये भारतीय व्यंजन या तिकिटावर देशातील विविध देवतांचे प्रसाद एकत्रित आहेत. त्यामध्ये गणरायाचा मोदक, तिरुपती बालाजीचा लाडू, जगन्नाथपुरीचा नैवेद्य वरण-भात, मथुरेचा पेढा आदी प्रसाद तिकिटावर आहेत.

नवीन वर्षानिमित्त विविध राज्यातील वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या बारा तिकिटांचा संग्रह श्री. वामनाचार्य यांच्याकडे आहे. या तिकिटावर जयपूर पॅलेसमधील गणपती असणारा गणेश पोलचे छायाचित्र आहे. तसेच मुंबईमधील लालबागचा राजा ला ८९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल कव्हर प्रसिद्ध करण्यात आले होते.

तिकिटावर जयपूर पॅलेसमधील गणपती असणारा गणेश पोलचे छायाचित्र आहे.
छत्तीसगड संस्कृती व पुरातन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तिकिटावर बारसूर गणेश मंदिर आहे

त्यावरील गणरायाची सुवर्ण मुद्रा आकर्षित आहे. छत्तीसगड संस्कृती व पुरातन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तिकिटावर बारसूर गणेश मंदिर आहे. याशिवाय पुणे गणेश फेस्टिव्हलचे टपालकार्ड श्री. वामनाचार्य यांच्या संग्रहात आहे.

"भारतीय टपाल विभागाने बुद्धीदेवता गणरायच्या विविध ‘थीम’ घेऊन तिकिटे प्रकाशित केली आहेत. अशी तिकिटे मी संग्रहित करत आहे." - रवींद्र वामनाचार्य, टपाल तिकीट संग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT