On the day of Ganesha Visarjan, public Ganesh Visarjan procession started by raising sreefal by Gangaves Mitra Mandal MLA Manikrao Kokate, former MLA Rajabhau Vaje. esakal
नाशिक

Ganesh Visarjan 2023: गणपती निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला! गणरायाला वाजत- गाजत निरोप

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Visarjan 2023 : गणेशोत्सवाच्या चैतन्यमयी सोहळ्याची गुरुवारी (ता. २७) अनंत चतुर्दशीला सांगता झाली. सर्वत्र उत्साह आणि आनंद घेऊन आलेल्या गणरायाला वाजत-गाजत निरोप देण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले होते.

'गणपती निघाले गावाला.. चैन पडेना आम्हाला', अशी भावना भाविकांची झाली असली, तरी विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह पोलिस, महापालिका प्रशासनाने कंबर होती. (Ganesh Visarjan 2023 Farewell to Ganaraya at sinnar nashik)

नऊ दिवस अवघी सिन्नर नगरी जणू 'गणरंगी' रंगली होती. घरगुती गणेशोत्सवाचा उत्साह, सोसायट्यांमध्ये बालगोपाळांचा जल्लोष, सार्वजनिक गणेश मंडळांचे आकर्षक देखावे आणि ते पाहण्यासाठी भाविकांनी विक्रमी संख्येनी केलेली गर्दी, असे भक्तिमय वातावरण अनुभवण्यास मिळत होते.

विसर्जन मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आकर्षक रथ सजले होते मिरवणुकीला साज चढविण्यासाठी ढोल-ताशा पथके, दिंड्या सज्ज झाल्या होत्या.

गंगावेस भागातून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून काढण्यात आली. गंगावेस, लाल चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस मार्ग गणपती मंडळे मार्गस्थ करण्यात आली होती.

या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी सज्जता केली होती. मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी पोलिस दक्ष होते.

विसर्जन घाटांवरही पालिकेची कर्मचारी तैनात होते तसेच अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक कुंड तयार करण्यात आली होती . मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.

येथील गंगावेस भागात सायंकाळी पाच वाजता गंगावेस मित्र मंडळाच्या गणरायाला आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.

माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माजी उपनगराध्यक्ष नामदेवलोंढे, बाळासाहेब उगले, माजी नगरसेवक प्रमोद चोथवे, अशोक जाधव, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, अॅड. एन. एस. हिरे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शिवसेना तालुकाप्रमुख शरद शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिदीन खतीब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल आदींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मिरवणूक गंगावेस, लालचौक, शिंपी गल्ली, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावीवेस मार्गे पुढे नेण्यात आली. मंडळांनी सोयीनुसार गणेश विसर्जन करण्यासाठी सजवलेले ट्रॅ्नटर व रथ नेले. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक संपली.

विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मोठी प्रमाणात गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात येत होते. यावेळी महिला तसेच पुरुष व बालचिमुकले गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रत्येक चौकात गर्दी केलेली दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT