A grand Ganesha idol and continuous sound of drums in the immersion procession esakal
नाशिक

Ganesh Visarjan: डोळे भरून आले तुला निरोप देताना! विसर्जनाला नाशिककरांच्या उत्साहाला उधाण; 12 तासांवर मिरवणुका

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganesh Visarjan : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत मिरवणुकीत नाशिककरांच्या उत्साहाला उधाण आले होते.

ढोल-पथकांचा निनाद, टाळमृदृंग गजर अन्‌ डीजेचा दणदणाटात गुरुवारी (ता. २८) बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. (Ganesh Visarjan Tears filled my eyes saying goodbye to you Nasikkars enthusiasm for immersion Processions for 12 hours nashik)

मानाच्या पहिल्या महापालिकेच्या गणपतीची मिरवणूक दुपारी साडे अकराला निघाली.जुने नाशिक भागातील वाकड मिरवणूक मार्गात कुठे अडथळा निर्माण होणार नाही, मिरवणूक कुठे रेंगाळणार नाही यासाठी लायझनिंग ऑफिसर आणि दहा कर्मचारी प्रत्येक मंडळाला देण्यात आले.

पहिल्यांदाच नाशिक शहरात असा उपक्रम राबविण्यात आला. चौकात राष्ट्रवादी, भाजप, श्रमिक सेना, संत गाडगे महाराज पतसंस्था आदींनी स्वागत कक्ष उभारले होते.

गणेशभक्तांसाठी महापालिकेकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जुनी महापालिका येथे महापालिकेतर्फे प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग दिसून आला.

संबळ, ढोल- वादकांची जुगलबंदी

यंदा प्रथमच ढोल वादकांनी वेगळी ताल मिरवणुकीसाठी बसविली होती. ढोल वादकांनी वेगळ्या तालींसह पारंपारिक वाद्य असलेल्या संबळ व ढोलचा नवीन ताल सादर केला. या जुगलबंदीला गणेशभक्तांनी दाद देत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

मर्दानी खेळांचे प्रदर्शन

मुख्य मिरवणुकीत अनोखे चित्ररथ मानाच्या गणेश मंडळांनी सादर केले. चित्ररथासह मर्दानी खेळांचे प्रदर्शनाने गणेशभक्तांचे मनोरंजन झाले. ढोल पथकांनी ढोलचा निनाद करत ध्वज नाचविले.

बॅन्जो व डीजेची गाणी, लेझर शो- च्या चमचमत्या प्रकाशात गणेशभक्तांनी एकच ठेका धरला, तरुणाई बेफाम होऊन थिरकली. पावसाने दोन दिवसांनी घेतलेल्या विश्रांतीनंतर गुरुवारी ऊन पडले, तापमानात उष्णता असल्याने काही ढोल वादकांना चक्कर आल्याच्या घटना घडल्या.

मेहेर सिग्नलपर्यंत येण्यात चौदा मंडळांनाच यश

शासकीय मानाच्या महापालिका गणपतीनंतर अनुक्रमे रविवार कारंजा, गुलालवाडी मित्रमंडळ, भद्रकाली मंडळ, श्रीमान सत्यवादी मंडळ,नाशिकचा राजा, सरदार चौक मंडळ, रोकडोबा मंडळ, शिवसेवा मंडळ, शिवमुद्रा मंडळ, मानाचा राजा, युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनेश्वर युवक समिती, नेहरू चौक मंडळ, वेलकम सहकार्य मंडळ, श्रीगणेश मूकबधिर मंडळ, युवक संघ प्रतिष्ठान, गजानन मंडळ, महालक्ष्मी फाउंडेशन, उत्कर्ष मित्रमंडळ आदी २१ मंडळांची मुख्य मिरवणूक होती.

परंतु युनायटेड फ्रेंड सर्कल मेहेर सिग्नलवर आल्यानंतर मिरवणुकीची वेळ संपल्याने सार्वजनिक मंडळांनी मिरवणूक थांबविली.

दहाच्या सुमारास उत्कर्ष मित्र मंडळाची मिरवणूक देखावा भद्रकाली मार्केटपर्यंतच पोचू शकला. दरम्यान दोन मंडळांच्या मिरवणुकीमध्ये जवळपास चाळीस मिनिटे ते एक तासाचा खंड पडला होता.

शिवसेवा मित्रमंडळाचा देखावा ठरला भारी

शिवसेवा मित्रमंडळाचा देखाव्यात केरळचे थेय्यम नृत्य प्रकार सादर केला. यात वाद्यावर शिव, महाकाली व त्यांच्या देव गणांनी केलेले नृत्य गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. २१ मानाच्या गणपतींमध्ये रविवार कारंजा मित्रमंडळाच्या मिरवणुकीत अघोरी पथकाने नृत्य केले.

दंडे हनुमान मित्रमंडळाने हनुमान आणि वानर सेनेचा देखावा सादर केला. युवक मित्र मंडळाकडून लेझर शो सादर झाला. सूर्यप्रकाश- नवप्रकाश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाकडून चांद्रयान 3 चा देखावा सादर करण्यात आला. प्रकाश कनोजे यांनी ऑनलाइन गेमच्या विरोधात जनजागृती केली.

घड्याळाच्या टिकटिककडे दुर्लक्ष, जनसागर उसळला

बारा तासांवर चाललेल्या मिरवणुकीमध्ये सार्वजनिक मंडळांनी घड्याळाच्या टिकटिककडे दुर्लक्ष केले. महापालिका, गुलाल वाडी, साक्षी गणपतीचे रात्री पावणेदहाच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. त्यानंतर नाशिकचा राजा नऊला रविवार कारंजापर्यंत पोचला.

दंडे हनुमान मित्रमंडळ रात्री बाराला अशोकस्तंभाजवळ तर युनायटेड फ्रेंड सर्कल मित्र मंडळाची मिरवणूक मेहेर सिग्नलपर्यंतच पोचली. सायंकाळी पाचनंतर मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली.

जवळपास लाखावर गणेशभक्तांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याने मिरवणूक मार्गांवर जनसागर उसळल्याची अनुभूती आल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT