While performing the aarti to Lord Ganpati of the Municipal Corporation, Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar and Mrs. Saili Pulkundwar. SYSTEM
नाशिक

Ganeshotsav 2022 : मानाच्या गणपतीला मानवंदना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी महापालिका मुख्यालय व मेनरोड येथील जुन्या महापालिका इमारत कार्यालयात श्रीगणेशाची स्थापना केली जाते. बुधवारी (ता. ३१) ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात झाली. (Ganeshotsav 2022 Tribute to Manacha Ganpati at NMC office by nmc commissioner nashik Latest Marathi News)

महापालिकेच्या मेनरोड कार्यालयात मानाच्या गणेशाची स्थापना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सौ. सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते झाली. ढोल पथकाचे वादन आणि टोपी देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी आयुक्तांचे स्वागत करून लक्ष्मीची प्रतिमा भेट दिली.

उपायुक्त करुणा डहाळे यांनी सायली पुलकुंडवार यांना साडी भेट दिली. या वेळी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथेही गणेशाची स्थापना श्री व सौ. पुलकुंडवार यांच्या हस्ते झाली.

या वेळी गरीबरथ ढोल वाद्य पथकाने मानवंदना दिली. उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर, उपायुक्त विजयकुमार मुंढे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सचिन जाधव, जितेंद्र पाटोळे, नितीन पाटील, संदेश शिंदे, उपअभियंता नवनीत भामरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, विभागीय अधिकारी नितीन नेर, मदन हरिश्चंद्र, कैलास राबडीया, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, वैद्यकीय अधीक्षक राजाराम जाधव, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, नितीन गंभिरे, वाल्मीक ठाकरे आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT