Amhi an Amche Bappa competition news esakal
नाशिक

Ganeshotsav 2022 : गणेशभक्तांसाठी यंदाही ‘SAKAL’तर्फे अनोखी स्पर्धा

प्रतीक जोशी

नाशिक : वर्षभरापासून ज्याच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे आता सर्वांना वेध लागले आहेत. लवकरच घरोघरी विघ्नहर्ता गणेश विराजमान होणार आहे.

बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला उधाण येणार आहे. हा आनंदोत्सव साजरा करताना यंदाही ‘सकाळ’ घेऊन येत आहे, वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेली अनोखी स्पर्धा ‘आम्ही अन् आमचे बाप्पा’. (Ganeshotsav 2022 unique competition by SAKAL for Ganesha devotees Nashik Latest Marathi News)

दोन वर्षांचा कोविड काळ लोटल्यानंतर यंदा बाप्पाचा उत्सव कोणत्याही बंधनाशिवाय साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘आम्ही अन् आमचे बाप्पा’ ही स्पर्धा वाचकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

वाचकांचा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला होता. यंदाही ‘सकाळ’तर्फे वाचकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘उत्सव गणरायाचा, जागर आनंदाचा’ म्हणत विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव आनंद अन् उत्साहाने साजरा करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उद्याचा ‘सकाळ’ नक्की वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT