Bhadrakali Yuvak Mitra Mandal and Mohanmaster Talim Sangh live look at politics esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: रिमझिम पावसातही गणेशभक्तांचा उत्साह! आरास पाहण्यासाठी मंगळवारी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस बाकी असताना मंगळवारी (ता. २६) नाशिककरांनी गणपतीचे आरास पाहण्यासाठी सलग चौथ्या दिवशी गर्दी केली होती. सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली.

रिमझिम पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते नागरिकांनी फुलले होते. काही काळ प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झाला. (Ganeshotsav 2023 Ganesha Devotees Enthusiasm Even in Drizzling Rain Crowd on Tuesday to see decoration nashik)

गणेशोत्सवात शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी जोरदार पावसाच्या आगमनानंतर सायंकाळी रिमझिम पाऊस झाला.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसानंतर देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी शहरातील मुख्य मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी केली.

बाप्पाच्या दर्शनासह मंडळांनी साकारलेले विविध देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शेवटचे दोन दिवस बाकी असताना गणेशभक्तांचा उत्साह शिगेला आहे. गणेशोत्सवात शनिवारी व रविवारी देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

सोमवारीही नाशिककर मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. यंदा मंडळांनी राजकीय स्थितीवरही भाष्य केले आहे. जिवंत देखावेसह पोस्टर साकारण्यात आलेले आहेत. या देखाव्यांमधून नाशिककरांचे चांगलेच मनोरंजन होत असून, समाजप्रबोधन करण्याचे काम मंडळाकडून सुरू आहे.

वेलकम ग्रुपनेही ‘शिक्षणाचा बोजवारा या विषयावर जिवंत देखावा सादर केलेला आहे. हा देखावा पाहण्यासाठीही नाशिककर गर्दी करत आहेत. शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक मंडळांनीही विविध पौराणिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक देखावे सादर केले असून, या देखाव्यांमधून लहान मुलांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

भद्रकालीचा श्रीमंत राजा, नटराज बंधू मित्रमंडळाचा भद्रकालीचा राजा, श्री साक्षी गणपती, शिवसेवा मित्रमंडळ, प्रेरणा मित्रमंडळ आदी जुन्या मंडळांच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी नाशिककरांनी सहकुटुंब मोठी गर्दी केली आहे.

जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष

भद्रकाली युवक मित्रमंडळ आणि मोहनमास्तर तालीम संघाचा राजकारणावरील जिवंत देखावा सर्वांचेच लक्ष वेधताना दिसला.

यात कलावंतांनी साकारलेले शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील प्रमुख नेत्यांचे पात्र यातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उडालेली भंबेरी यातून उपस्थितांमध्ये हशा पिकला. राजकारणावर केलेले प्रबोधनात्मक भाष्यावर नाशिककरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT