ganeshwadi garden esakal
नाशिक

Nashik News : गणेशवाडी उद्यानाची मरणासन्न आवस्था! गवत वाढले, ॲंगल चोरीला अन्‌ स्वच्छतेचाही अभाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुन्या लोकवस्तीच्या भागालगत विकसित करण्यात आलेले गणेशवाडी उद्यान सध्या मरणासन्न आवस्थेत आहे. या उद्यानात नव्याने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, या रोपांभोवती प्रचंड गवत वाढले आहे.

बाजूचा जॉगिंग ट्रॅकही त्यामुळे दिसत नाहीत. सरंक्षक भिंतीचे अँगल कापून नेण्यात आलेले आहेत. स्वच्छता गृहाची तोडफोड झालेली आहे. लहान मुलांसाठीची खेळणी तूर्त सुरक्षित असली, तरी त्या भागात जाण्यासाठी स्वच्छता नाही.

याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (Ganeshwadi park dying Overgrown grass angle theft and lack of cleanliness Nashik News)

गणेशवाडीत अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या भागात उद्यान विकसीत करण्यात आले आहे. या उद्यानातील मोकळ्या भागात वाढलेल्या गवतावर पूर्वी जनावरे चारण्यासाठी आणली जात.

त्या जागेत नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, वृक्षारोपणानंतर त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले असल्याने रोपांभोवती प्रचंड गवत वाढले आहे. गवत वाढल्याने रोपांच्या वाढीवर मात्र विपरीत परिणाम होत आहे.

पेव्हर ब्लॉकवर गवत

उद्यानाच्या दक्षिणेला दगडी भिंती आणि त्यावर अँगल बसवून सुरक्षित कुंपण तयार करण्यात आले होते. मात्र, या कुंपणाचे लोखंडी अँगलच कापून नेण्याचा प्रकार घडला आहे. दगडी भिंतही खचली आहे. उद्यानात पेव्हर ब्लॉक टाकून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता. त्यावरील पेव्हर ब्लॉकही गायब आहेत. जे आहेत, त्याच्यावरही गवत वाढलेले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

खेळणी बऱ्यापैकी, पण...

ज्या भागात मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात आलेली आहेत, त्याच्याजवळच स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या स्वच्छतागृहाची सध्या मोडतोड झालेली आहे. त्यामुळे नुसत्या भिंतीच उभ्या असलेल्या दिसतात. त्याच्या भोवतीही काटेरी झुडपे आणि गवत वाढलेले आहे.

विशेष म्हणजे येथील खेळणींची अवस्था बऱ्यापैकी आहे. तुट फूट झालेली खेळणी दुरुस्त करून व काही खेळणी नव्याने बसविण्यात आली आहेत. असे असताना येथे खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांना गवत आणि काटेरी झुडपांच्या भागातून ये-जा करावी लागते. त्यामुळे खेळणी असलेल्या भागात स्वच्छता होणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT