Nashik Crime latest news
Nashik Crime latest news esakal
नाशिक

Crime Update : मुलींना फुस लावून विक्री करणारी टोळी जेरबंद

नरेश हाळणोर

नाशिक : ओझर परिसरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी तीन महिला व दोन पुरुषांच्या टोळीला जेरबंद केले.

तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून, संशयितांनी या अल्पवयीन मुलीची लग्नासाठी परराज्यात १ लाख ७५ हजार रुपयांना विक्री केली होती. मध्यप्रदेशातील खरगोणमध्ये गेलेल्या नाशिक ग्रामीण पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेक करीत हल्ला करण्यात आला.

तरीही पोलिसांनी संशयितांसह अल्पवयीन मुलीची सुटका केली. दरम्यान, याप्रकरणी संशयितांकडून आणखीही काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. (gang that seduces and sells girl is jailed under operation muskan Nashik Crime Update latest marathi news)

प्रियंका देविदास पाटील (रा. कार्बन नाका, सातपूर. सध्या रा. ओझर, ता. निफाड), रत्ना विक्रम कोळी (रा. दहावा मैल, ओझर, ता. निफाड), सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर, जि. धुळे), नानुराम येडू मनसारे, गोविंद नानुराम मनसारे (दोघे रा. लखापूर, ता. भिकनगाव, जि. खरगोण, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

ओझर पोलीस ठाण्यात गेल्या २३ जुलै रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ओझर पोलीसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गुन्ह्याचा तपास करताना महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्यानुसार पोलिसांनी मुख्य सूत्रधार व मुलीचे फुस लावून अपहरण करणारी प्रियंका पाटील हिला अटक केली. पोलीस चौकशीतून तिने अपहृत अल्पवयीन मुलगी रत्ना कोळी हिच्या मदतीने शिरपूरमध्ये सुरेखाबाई भिला हिला १ लाख ७५ हजार रुपयांना विक्री केल्याचे सांगितले.

त्यानुसार, ओझर पोलीसांनी शिरपूरातून संशयित सुरेखाबाईला अटक केली. तिच्या माहितीनुसार, मुलीच्या शोधार्थ पोलीस बडोदरा (गुजरात)मध्ये गेली. तपासात सदरील मुलगी मध्यप्रदेशातील खरगोणमध्ये असल्याचे समजल्यावर पोलीस खरगोणमध्ये पोहोचली. याठिकाणाहून पोलिसांनी अपहृत मुलीची सुटका केली.

तसेच, नानुराम मनसारे, गोविंद मनसारे या दोघांसह तिघा महिलांना अटक केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी.ए. जाधव, उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार आहिरराव, धारबळे, मोरे, जाधव, डंबाळे, बागुल, पानसरे यांच्या पथकाने बजावली. ओझर पोलीसात ह्युमन ट्रॅफिकिंग ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे, नोकरीचे आमिषाची फूस

सदरील १४ वर्षीय अपहृत मुलीला पैसे व नोकरीचे आमिष दाखवून संशयितांनी फूस लावून पळवून नेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घटनेमुळे परराज्यापर्यंत धागेदोरे पोहोचल्याने मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांनी सदर मुलीचा खरगोणमध्ये लग्न लावून देण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच यापूर्वीही संशयितांनी पंचवटी व सातपूरमधून मुलींना अशाचरितीने फुस लावून पळवून नेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

संशयित महिला या ग्रामीण, झोपडपट्टी वसाहतीतील मुलांना हेरून त्यांना विश्‍वास संपादन करीत. त्यानंतर त्यांना पैसे, नोकरीचे आमिष दाखवून पळवून नेणे आणि परराज्यात लग्नासाठी विक्री करण्याची संशयितांची पद्धत होती.

"अल्पवयीन मुलींचे अपहरण करून विक्री करणारी ही संघटित टोळी आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या पाच वर्षांतील दाखल गुन्ह्यांची नव्याने तपास सुरू करण्यात येईल. याप्रकरणात खरगोणचे पोलीस अधीक्षकांच्या समन्वयातून पुढील कारवाई केली जाईल. तसेच सर्वांगांने गुन्ह्याचा तपास केला जाईल." - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT