suraj mandhare.jpg 
नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण फुल्ल; लवकरच होणार विसर्ग - जिल्हाधिकारी

सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : अपुऱ्या पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला धरणे भरतील की नाही अशी स्थिती असताना गेल्या आठ दिवसांपासून धरण परिसरातील संततधारेमुळे शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९२ टक्के भरले आहे. पुढील दोन दिवसात धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४८ तासांत गोदावरीत पाणी सोडले जाणार

पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणात ५ हजार १७३ दशलक्ष घनफुट पाणी साचले आहे. त्याची टक्केवारी ९१.८८ टक्के आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सातत्याने पाऊस सुरु राहिल्यास पुढील ४८ तासांत गोदावरीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना 

पुरस्थिती लक्षात घेवून लघुकृती आराखडा तयार 
अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे
नागरिकांसाठी १०७७ टोल फ्रि क्रमांक 
विसर्ग सुरु होण्यापुर्वी जिल्हा नियंत्रण कक्षाला पाटबंधारे विभागाने कळवावे
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे 
पूरामुळे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करावे
बचावपथकाने सामुग्रीसह तयार राहावे
आकाशवाणीवरून नागरिकांना पूराची माहिती द्यावी 

शहरातील पुररेषेत सावधानता 

महापालिका हद्दीतील गोदावरी व उपनद्यांच्या किनारी असलेल्या वस्तीली नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पूरक्षेत्रात साधनसामुग्री तयार ठेवणे, अग्निशमन दल, पोहणारे, सुरक्षा रक्षक यांना घटनास्थळी रवाना करणे, वैद्यकीय विभागामार्फत औषधे पुरविणे, पूररेषेतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे आदी जबारदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. 

संपादन - किशोरी वाघ


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT