Ganja trees growing under Janakumbh in Pinjarghat area esakal
नाशिक

Nashik News : पिंझारघाट महापालिका जलकुंभाखाली गांजाची झाडे

Ganja trees under Pinzarghat Municipal Waterworks...

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या पिंझारघाट परिसरात महापालिका जलकुंभाखाली गांजाचे झाडे वाढून शेती फुलत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे येथे मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे वाढली होती.

‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसारित होताच महापालिकेकडून स्वच्छता करत गांजाची झाडे नष्ट केली होती. त्यानंतर दुर्लक्ष झाले. पुन्हा झाडे वाढली आहे. कायमस्वरूपी येथील झाडे नष्ट करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. (Ganja tree under Pinjar Ghat Municipal jalkumbh nashik news)

पिंझारघाट भागात महापालिकेच्या जलकुंभ भागात गांजाची झाडे वाढलेली दिसून येत आहे. प्रतिबंधक क्षेत्र असले तरी नशेबाज, टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. दुपारी, सायंकाळी तसेच रात्री नशेबाज अमलीपदार्थाचे सेवन करत बसलेले असतात. गांजाचे बहुतांशी कण तेथे पडतात. त्यातूनच गांजाची झाडे वाढत आहे.

सध्याही जलकुंभाखाली वाढलेल्या गाजर गवत, जंगली झाडे यात गांजाच्या झाडांचे मोठे प्रमाण आहे. महापालिकेकडून येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथे जणू शेती अवतरली आहे. काही महिन्यांपूर्वी येथे गांजाची झाडे वाढली होती. ‘सकाळ’ अंकात वृत्त प्रसारित झाले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेने त्वरित स्वच्छता केली होती.

सध्या पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. महापालिकेसह पोलिसांचे परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याने सतत टवाळखोरांचा वावर आहे. रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे स्वच्छतेसंदर्भात, तर पोलिसांकडे गस्त वाढविण्याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीस केराची टोपली दाखवण्याचे काम आतापर्यंत झाले आहे.

"रात्री उशिरापर्यंत भद्रकालीसह जुने नाशिक परिसरातील काही ठराविक अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या पानटपऱ्या, हातगाडे उघडे राहतात. येथून टवाळखोर अमलीपदार्थ खरेदी करून जलकुंभाखाली नशा करतात. दुसरीकडे महापालिका अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करते तर पोलिसांची गस्त अपुरी पडते." - अफजल काजी, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला मिळाली गती - मुरलीधर मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT