suicide.jpg 
नाशिक

बायकोसोबत वाद...कौटुंबिक कलह...भर संतापात केला धक्कादायक प्रकार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गुरुवारी (ता. 18) रात्री बारा वाजता दारु पिऊन तो घरी आला... किरकोळ कारणावरुन बायकोसोबत झाला वाद...रागारागात तसाच घराबाहेर पडला...खूप वेळ झाला तरी नवऱ्याचा पत्ताच नाही म्हटल्यावर बायकोही घाबरली. घरच्यांनी केली शोधाशोध अन् नंतर जे घडलं ते भयानक होते...

अशी घडली घटना

कांबळेवाडी, सातपूर येथील गौतम शंकर मगर (वय 42) या इसमाने सातपूर आयटीआय ग्राउंडमधील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गौतम हा रात्री दारू पिऊन आला असता त्याचे आपल्या पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने तो रात्री बारा वाजतेच्या सुमारास घरातून रागारागात निघून गेला. शोधाशोध करुनही त्याचा पत्ता काही लागेना. त्यातच आयटीआय कॉलेज ग्राउंड परिसरातील एका बाभळीच्या झाडाला फाशी लावून एका पुरुषाने आत्महत्या केल्याचे समजताच घरच्यांनी तिकडे धाव घेतली असता हा प्रकार समोर आला.

गौतमच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नसून अधिक तपास सुरु आहे. या घटनेबाबत कलम ए. डी. नंबर 68/2020 प्रमाणे दाखल केला असून सदर घटनेचा इनक्वेस्ट पंचनामा व घटनास्थळ पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस हवालदार कोटमे करत आहेत. अशी माहिती सातपूरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT