An inn criminal who was arrested when he came to the village to sell katta. Along with Senior Police Inspector Vijay Dhamal of Unit One of City Crime Branch and team esakal
नाशिक

Nashik Crime : गावठी कट्टा विक्रीसाठी आला अन्‌ अडकला; कट्टा, 3 जिवंत काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मुंबई- आग्रा महामार्गावरील छान हॉटेल परिसरात गावठी कट्टा व काडतुसे विक्रीसाठी आलेला संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. (Gavathi Katta came for sale and got stuck Katta 3 live cartridges recovered Nashik Crime)

सनी रमेश दळवी (३४, रा. अभिनव रो हाऊस, बंदावणेनगर, कामटवाडा, नाशिक) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार विशाल काठे यांना संशयित दळवी गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी त्या आधारे पथकाला सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पथकाने महामार्गावरील छान हॉटेल परिसरात सापळा रचला होता. गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री संशयित दळवी त्या ठिकाणी आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या वेळी त्याच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि दुचाकी (एमएच- १५- सीक्यू- ४५७८) असा ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दळवीविरोधात मारहाणीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, नझीम पठाण यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ तुळजापूरमध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटला

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT