arretsed esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी कट्टा विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा विक्री करणाऱ्या तिघांना दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने अटक केली आहे.

चिन्मय केशव काकड (२६, रा. काकड मळा, जुना चांदशी रोड, मखमलाबाद रोड, नाशिक), रितेश अनिल बागूल (रा. आडगाव नाका, पंचवटी), राज प्रल्हाद मदोरिया ऊर्फ प्रिन्स (रा. जाधव कॉलनी, पंचवटी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. (Gavathi pistol selling three arrested Nashik Crime News)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या सूचनेनुसार, दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गावठी कट्टे बाळगणाऱ्यांची माहिती काढली. पथकाचे हवालदार विजयकुमार सूर्यवंशी यांना म्हसरूळ हद्दीत चिन्मय काकड याच्याकडे गावठी कट्टा असून तो मखमलाबाद गावात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे व हवालदार शमशुद्दीन शेख, श्रीशैल सवळी, मोहन देशमुख, कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, विशाल जोशी यांनी सापळा रचून चिन्मयला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, १ गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक निकामी पुंगळी मिळून आली.

तसेच रितेश बागूल व राज मदोरिया यांनी गावठी कट्टा व काडतुसांची खरेदी-विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT