bahiri sasana.jpg 
नाशिक

निसर्गमित्राने दिले बहिरी ससाण्याला जीवदान! इमारतीच्या छतावर आढळला जखमी अवस्थेत 

सोमनाथ कोकरे

नाशिक : टिळकवाडीतील सिटीप्राईड हॉटेलजवळील शाश्वती बंगल्याशेजारील इमारतीच्या छतावर बहिरी ससाणा पक्षी जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या पंखाची फडफड ऐकून संकेत शेलार यांनी त्याचा शोध घेतला. ‘निसर्गमित्र’चे मनीष गोडबोले यांना माहिती मिळताच त्याच्या जखमेवर उपचार सुरू करण्यात आले. 

जखम बरी झाल्यावर तो भरारी घेण्यास सक्षम
हा पक्षी बहिरी ससाणा असल्याचे ज्येष्ठ जाणकार सतीश गोगटे व अनिल माळी यांनी सांगितले. सध्या पक्ष्याच्या जखमेवर पशुपक्षी चिकित्सक डॉ. संजय गायकवाड उपचार करत आहेत. पक्षीमित्र मनोज वाघमारे यांनी त्याच्या भक्ष्याची व्यवस्था केली आहे. जखम बरी झाल्यावर तो भरारी घेण्यास सक्षम होताच त्यास दूर निसर्गात सोडले जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. 

बहिरी ससाण्याची वैशिष्ट्ये 
बहिरी ससाणा भारतातील दुर्मिळ पक्षी आहे. त्याचे भक्ष्य मांस असल्याने तो छोट्या पक्ष्यांची सहजपणे शिकार करतो. जमिनीवरील भक्ष्यावर आकाशातून वेगात सूर मारून शिकार करतो. तो अतिशय चपळ आहे. त्याची नजर व चोच अतिशय तीक्ष्ण असल्याने शिकार करणे व खाणे सोपे होते. 


डोळ्याभोवती असलेल्या पिसांच्या कल्ल्यांमुळे तो सहज ओळखता येतो. बहिरी हे नाव अरबी असून, अरबी भाषेत ‘बहारी’ या नावाने तो ओळखतात. याचे शास्त्रीय नाव पेरेग्रीन फाल्कन आहे. त्याचा सूर मारण्याचा ताशी वेग ३९० किलोमीटर आहे. त्याच्या पंखांचा विस्तार ७५ ते १२० सेंटिमीटर असतो. पूर्ण वाढ झालेल्या बहिरी ससाण्याचे वजन एक ते दीड किलो असते. यामध्ये मादी पक्ष्याचे वजन नरापेक्षा जास्त असते. आखाती देशांत या पक्ष्यास पाळले जाते. याचा वापर शिकारीसाठी होतो. भारतात ७० ते ८०च्या दशकात पक्ष्याच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. या पक्ष्याची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे डीडीटीसारख्या कीटकनाशकांचा बेसुमार वापर हा होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर शहरात ‘डीजे’चा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त! पोलिस अन्‌ नेत्यांच्या कानात बोळे, अधिकारी झाले बधीर; आवाज मोजणाऱ्या पोलिसांकडील मशीन नावालाच

Jammu-Kashmir Rain Update : 'जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी'; कथुआत सात जणांचा मृत्यू; रेल्वेसेवाही विस्कळित

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

SCROLL FOR NEXT