Speaking at the meeting, former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal. Former MP Sameer Bhujbal and City President Ranjan Thackeray are neighbors.
Speaking at the meeting, former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal. Former MP Sameer Bhujbal and City President Ranjan Thackeray are neighbors. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal | आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज व्हा : छगन भुजबळ यांचे आवाहन

विक्रांत मते

नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती असली तरी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक विधान केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. (Get ready for upcoming municipal elections Chhagan Bhujbal appeal Nashik News)

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी करून आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका बाजार समिती व इतर संस्थांवर जास्तीत- जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी नियोजन करा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. भुजबळ यांनी या वेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर नागरिकांचे हितासाठी आंदोलन उभे करावे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात व ग्रामीण भागात तालुकानिहाय एक दिवसीय शिबिराचे आयोजन करावे. पक्षाची सभासद नोंदणी वाढवावी. पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत- जास्त मतदार नोंदणी करावी.

माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत मंजुने, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, अशोक सावंत, संजय चव्हाण, शिवराम झोले, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र ढोकळे, ॲड. शिवाजी सहाणे, सयाजी गायकवाड, संजय बनकर, पुरुषोत्तम कडलग, माजी नगरसेवक गजानन शेलार, सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, हरेश भडांगे, शेफाली भुजबळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक, समाधान जेजुरकर, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, महेश भामरे आदी उपस्थित होते.

समतेचा विचार पोचवा

जाती-धर्माच्या वादात न पडता नागरिकांमध्ये समतेचे विचार पोचवण्याचे काम करावे. देशातील सत्ता मोजक्या धर्मांध लोकांच्या हाती गेली असून हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाची प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT