Gharkul Scheme esakal
नाशिक

Gharkul Scheme News: सव्वा लाखांत घर बांधण्याची कसरत; बांधकामासाठी लागणारे साहित्य महागल्याचा परिणाम

घर बांधकामासाठी लागणाऱ्या खडी, वाळू, सिमेंट, गज, पत्रे, स्टील, मजुरी यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

जलील शेख

मालेगाव : घर बांधकामासाठी लागणाऱ्या खडी, वाळू, सिमेंट, गज, पत्रे, स्टील, मजुरी यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुसरीकडे मजुरीचे दरही वाढत चालले आहेत, त्यामुळे घरकुल योजनेंतर्गत दिले जाणार सव्वा लाखांचे अनुदान तोकडे ठरत आहेत.

त्यामुळे अनेक घरांची कामे अपुरी राहिली आहेत. दुसरीकडे ज्यांच्या कुवत आहे असे आणि प्रसंगी कर्ज काढून घरांचे काम पूर्ण करण्याची कसरत गरिबांना करावी लागत आहे.

त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने प्राप्त परिस्थितीचा विचार करून घरकुलांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करावी अन्यथा योजनेचा मूळ हेतू सफल होणार नाही असे सध्याचे चित्र आहे. (Gharkul Scheme New build house in half lakh increased cost of construction materials nashik news)

ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाकडून पाच प्रकारच्या घरकुल योजनांचा लाभ गरिब, लाभार्थ्यांना दिला जातो. या योजनांमध्ये नवीन घर बांधकामासाठी २०१६ च्या निकषानुसार एक लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते.

सध्याची महागाई पाहता एक लाख वीस हजार रुपयात घर बांधता येणे केवळ अशक्य आहे. लाभार्थ्यांना घराचे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा कर्ज काढून पैसे टाकावे लागतात. शासनाने अनुदानात दुप्पटीने वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

घरकुल योजनेसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना या योजना आहेत. या योजनेंतर्गतही एक लाख २० हजार रुपयेच अनुदान दिले जाते.

या अनुदानातून लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पुर्ण होत नाही. २०१६ ते २०२४ पर्यंत अनुदानात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. महागाई पाहता घराचे बांधकाम करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो.

या योजनेत किमान २७२ स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम करायचे असते. लाभार्थ्यांना चार टप्प्यात अनुदान दिले जाते. बांधकाम करताना सिमेंट, विटा, मजुरी, पत्रे, लोखंडी पाईप, टाईल्स, खडी, वाळू यांच्या किंमतीतही दुप्पटीने वाढ झाली आहे.

शासनाने याचा विचार करावा व अनुदान वाढवावे. अनुदान दोन टप्प्यात द्यावे. जेणेकरुन लाभार्थ्यांना घराचे काम करणे सोपे होईल. प्रधानमंत्री आवास योजनेत २०२१-२२ मध्ये तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींना २२२८ घरकलांचे उद्दिष्टे होते. ते २०२२ मध्येच पूर्ण झाले. नवीन उद्दिष्ट अद्याप आलेले नाही.

मालेगाव तालुक्यातील आकडेवारी

योजनेचे नाव - सन -उद्दिष्टे - मंजुरी

प्रधानमंत्री आवास - सन २०२१-२२ - २२२८- २२२८
रमाई आवास - सन २०२१-२२- ४६६- २१३
शबरी आवास - सन २०२२-२३ - ६०४ - ४९७
शबरी आवास योजना - सन २०२३-२४ - ४२७ - २२५
मोदी आवास योजना - सन २०२३-२४- १०९७ - १०९७

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत अजून उद्दिष्ट आले नाही. तरीही १४० प्रकरणे समाज कल्याण विभागाकडे पाठविली आहेत.

"शासनाने घरकुल अनुदानाची रक्कम वाढवावी. जेणेकरुन लाभार्थ्यांच्या घराचे काम पूर्ण होणार आहे. काही लाभार्थी कर्ज काढून घराचे काम पूर्ण करतात. महागाई पाहता कमी रकमेत घरकुलाचे काम होणे सध्या तरी अशक्य आहे."

- जामराव निकम, घरकुल लाभार्थी, दाभाडी, ता. मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT