Grandmother while taking care of her granddaughter Soumya. 
नाशिक

Nashik News: घायाळ परिवाराकडून वाजतगाजत कन्येचे स्वागत! मुलगा व मुलगी सारखेच असल्याचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुलगी झाली म्हणून बेवारसरस टाकून दिल्याच्या अनेक घटना आपण नेहमी ऐकत असतो. स्त्री-पुरुष समानतेविषयी अनेक वेळा बोलले जात असले, तरी अजूनही अनेक समाजात मुलगा व मुलगी यात भेदभाव केला जातो. (ghayal family welcome grand daughter with celebration in naitale sinnar nashik news)

मात्र, येथील गोविंद दगडू घायाळ यांनी आपल्या नातीचे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करून मुलगा व मुलगीसारखीच असल्याचे समाजाला दाखवून दिले आहे.

येथील शेतकरी गोविंद घायाळ यांचा मुलगा रोहित घायाळ दिल्ली येथे आयटी इंजिनिअर असून, त्याची पत्नी प्रियांका घायाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी कन्येला जन्म दिला. त्या कन्येचे नाव सौम्या ठेवले आहे. माहेर असलेल्या रुई (ता. निफाड) येथून सौम्याला नुकतेच नैताळे येथे आणण्यात आले.

त्यावेळी घायाळ परिवाराने आपल्या घरावर रोषणाई करून रांगोळी व फुलांची सजावट केली होती. ढोलताशांच्या गजरात सौम्या व तिच्या आईचे आजी सरला घायाळ यांनी औक्षण केले. कन्येच्या अशा आगळ्यावेगळ्या गृहप्रवेशाचे अनेकांनी स्वागत केले.

"मानवाने चंद्रावर प्रवेश केला आहे. अनेक क्षेत्रात मुलगी मुलांच्या पुढे पाऊल ठेवत आहे. त्यामुळे मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक दिली पाहिजे. मुलीला सुद्धा वंशाचा दिवा मानले पाहिजे." -गोविंद दगडू घायाळ, आजोबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Bank Job : मोठा निर्णय! तुमच्या जिल्ह्यातल्या बँकेत तुम्हाला मिळणार नोकरी! ७० टक्के जागा रहिवाशांसाठी राखीव, कसा करायचा अर्ज? पाहा

KYC Problem: केवायसी करायला, डोंगरावर चला! मोबाइल नेटवर्क शोधण्यासाठी कळंकीतील नागरिकांची धावपळ

Latest Marathi News Live Update : मुस्लिम दुबार मतदारांवर ठाकरेंचं पांघरून - आमदार आशिष शेलार

SCROLL FOR NEXT