Vishnu Vagh and Vaishali Vagh, Vishnu Vagh and Vaishali Vagh, while gifting a coconut tree to the bride and groom while donating a tree to their niece's wedding. esakal
नाशिक

Unique Wedding : नारळवृक्ष भेट देऊन भाचीचे कन्यादान! मेहंदीतून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : नांदूरशिंगोटे येथील ईश्‍वररत्न लॉन्समध्ये नुकताच एक आगळा-वेगळा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात झाला.

वृक्षमित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तानाजी वाघ व त्यांची पत्नी वैशाली यांनी भाचीच्या या लग्न सोहळ्यात वधु-वरांना नारळ वृक्ष भेट देऊन कन्यादान केले. (gifting coconut tree message plant trees live trees through mehndi Unique Wedding at nandurshingote nashik news)

श्री. वाघ यांची भाची माधुरी रमेश घुगे (रा. निमोण) व मानोरी येथील राहुल किसन चकणे यांचा विवाह नुकताच झाला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार वाघ यांनी नवीन सोयऱ्यांना वृक्षभेट दिली.

दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीत याच भाचीने मामा विष्णू वाघ यांची एक महिना हॉस्पिटलमध्ये, तसेच घरी सेवा करून त्यांना जीवनदान दिले होते. तेव्हा त्यांना कृत्रिम प्राणवायूची गरज भासली होती. तेंव्हापासून त्यांनी प्राणवायू निर्मितीसाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.

वृक्षलागवड करत असतानाच वृक्षमित्र फाउंडेशनची स्थापना केली. आता त्याच भाचीला विवाह सोहळ्यात वृक्षभेट देऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. विशेष म्हणजे भाचीच्या लग्नानिमित्त त्यांनी स्वत:च्या हातावर रेखाटलेल्या मेहंदीतूनही ‘झाडे लावा- झाडे जगवा’ हा संदेश दिला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाची आवड असल्यास प्रत्येक प्रसंगात आपण तो संदेश देऊ शकतो, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले. कन्यादानानंतर नाव घेण्याची प्रथा जोपासतानाही त्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा, नारा हा वृक्षसंवर्धनाचा, वैशाली देते साथ मला, आधार तिला वृक्षमित्राचा’ असे नाव घेऊन त्यातूनही पुन्हा संदेश दिला.

जसा काळ बदलतो तशा काळाच्या गरजेनुसार प्रथाही बदलत जातात. पूर्वी वृक्ष खुप होते. आंब्याच्या डगळ्यांचा मांडव विवाह सोहळ्यात असायचा. आता वृक्ष कमी होत आहेत. म्हणून वृक्षभेट हे कन्यादानाचे आकर्षण बनले. ही नवीन वृक्ष कन्यादानाची प्रथा उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळीलाही आवडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT