Girija dudhat esakal
नाशिक

Nashik : शिवशाहीत पराक्रम गाजवणाऱ्या दांडपट्ट्याचा इतिहास उलगडणार

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : शस्त्र आणि युद्ध (Weapons and war) अभ्यासकांच्या संशोधनाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पोलंड येथे पुढील 'इंटरनॅशनल सायंटिफिक रिसर्च कॉन्फरन्स : फेस ऑफ वॉर' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युद्ध आणि युद्धाचे पैलू ही परिषदेची मध्यवर्ती कल्पना असून यावर्षीचा संशोधन विषय 'टूल्स ऑफ वॉर' म्हणजेच 'युद्धाची साधने' हा आहे. मूळच्या अहमदनगरच्या व सध्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे पुरातत्वशास्त्रात (archeology) उच्चशिक्षण घेत असलेल्या गिरीजा दुधाट यांच्या 'दांडपट्टा' या शस्त्रावरील शोधनिबंधाची (Dissertation) संशोधन परिषदेसाठी (research conference) निवड झाली आहे. (Girija Dudhat been selected for research conference on weapon Dandpatta Nashik News)

दांडपट्टा हे शस्त्र मराठी इतिहास अभ्यासकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवशाही व त्यानंतरच्या काळात अनेक मराठा सरदारांनी या शस्त्राने युद्धांमध्ये पराक्रम गाजवले होते. महाराष्ट्रामध्ये हे शस्त्र परिचित असले तरी भारताच्या इतर भागात आणि परदेशात दांडपट्टा फारसा ज्ञात नाही. या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्राची माहिती भारताबाहेरही व्हावी म्हणून सदर परिषदेसाठी दांडपट्टयाची शोधनिबंधासाठी निवड केली. या अभ्यासासाठी दुधाट यांना लंडनमधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, रॉयल आर्मोरियस तसेच दिल्लीतील नॅशनल म्युझियम, हैदराबादचे सालारजंग म्युझियम या संग्रहालयांची मोलाची मदत झाली आहे. महाराष्ट्र पुरातत्व खात्याचे प्रमुख डॉ. तेजस गर्गे यांचे देखील मार्गदर्शन मिळाले आहे.

"मध्ययुगीन काळात दांडपट्टा केवळ युद्धाचे साधन नाही तर सार्वजनिक सण-समारंभात प्रात्यक्षिकांचाही भाग होते. दांडपट्टा शस्त्राचे विविध ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक पैलू या शोधनिबंधातून उलगडले जाणार आहेत. या अभ्यासामुळे दांडपट्याबद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यासही मदत होणार आहे."

- गिरीजा दुघाट, शस्र अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT