Girish Mahajan esakal
नाशिक

Maratha Reservation : मराठा समाजाला ट्रिपल इंजिन सरकार आरक्षण देणार; गिरीश महाजन यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला टिकेल अशा पद्धतीचे आरक्षण देण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागेल; परंतु टिकेल असेच आरक्षण देऊ, असा दावा ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (ता. २४) येथे केला.

त्रिरश्मी लेणी, बुद्ध स्मारक येथे बोधी वृक्षाच्या रोपणाचा कार्यक्रम झाला, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाजन बोलत होते. (Girish Mahajan statement about maratha reservation nashik news)

ते म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी ४० दिवसांची मुदत दिली. आम्ही आरक्षण देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

या समितीचे काम सुरू आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर कायदेशीर आधार द्यावा लागेल. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. आरक्षण आमचेच सरकार देईल. आरक्षणाबाबत चर्चा ही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. मात्र, पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयोग होणार नाही.

सरसकट कुणबी प्रमाणपत्राची काही ठिकाणी आवश्यकता नाही, असा मतप्रवाह आहे. परंतु, मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्याचा समिती अभ्यास करीत आहे. अजून किती दिवस लागतील, हे मला सांगता येणार नाही.

आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास असल्याने आमच्या काळात मोर्चे निघत असल्याचे ते म्हणाले. माजी खासदार नीलेश राणे यांच्या निवृत्तीबाबत महाजन यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी असा निर्णय कसा घेतला, असे महाजन म्हणाले.

‘एमडी’चे महानायक तुमचेच

राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. या सत्तेतील गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटींची मागणी करीत होते. त्यामुळे ‘एमडी’चे महानायक असलेले ललित पाटील हे तुमचेच पदाधिकारी होते, असा आरोप महाजन यांनी केला. आमचे सरकार या ड्रग्जची पाळेमुळे नष्ट करण्याचे काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT