death news esakal
नाशिक

वेठबिगारीत मुलीचा बळी; मेंढ्या चारण्यासाठी नेऊन मारहाण

सकाळ वृत्तसेवा


घोटी (जि. नाशिक) :
उभाडे (ता. इगतपुरी) माळरानावरील आदिम कातकरी समाजाच्या अल्पवयीन चिमुरडीला मेंढ्या चारण्यासाठी नेत मारहाण करून गळफास लावून ठार करण्याचा प्रयत्न केला. अखेर सात दिवसांनंतर चिमुरडीचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संगमनेर पोलिस ठाण्याकडे तो वर्ग करण्यात आला आहे.


उभाडे येथील कातकरी वस्तीवरील तुळसाबाई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी (वय १०) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठविले होते. काही दिवसांनी चांगले सांभाळत असल्याचे भासवून नंतर गौरीला जबर मारहाण करून फास लावून बेशुद्धावस्थेत २७ ऑगस्टला मध्यरात्री उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा घराजवळ विकास कुदनार व साथीदारांनी तिला टाकून पलायन केले.

दारात कोण आहे हे पाहण्यासाठी तुळसाबाई गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरीत गुंडाळून बेशुद्धावस्थेत गौरी असल्याचे समजताच त्यांनीहंबरडा फोडला. आवाज ऐकून वस्तीवरील काही कुटुंबांतील सदस्यांनी तिला सिन्नर-घोटी मार्गावरील वाहनामधून घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, सचिव सुनील वाघ यांना घटना समजताच गौरीची तब्येत गंभीर असल्याने तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आदिम कातकरी समाजाची इगतपुरी तालुक्यात एक हजार ४०० कुटुंबे राहतात. यातील काही वीटभट्टी, खडी फोडणे, मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. गावकुसाला अथवा माळरानावर राहणाऱ्या कुटुंबीयांना पैशाची आमिष दाखवून विविध कामांना घेऊन त्यांना बंधबिगारीला लावले जाते. तालुक्यातील अनेक जोडपी, लहान बालके यांना वेठबिगारीकरिता नेऊन मानसिक, कौटुंबिक त्रास दिला जातो. याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून अधिक लक्ष केंद्रित करण्याची मागणी पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT