Blind Student esakal
नाशिक

Nashik News: दृष्टिबाधितांना तंत्रस्‍नेही ज्ञानदान..! KTHMचा पुढाकार, विद्यार्थी मिळवताय नावलौकिक

अरुण मलाणी

Nashik News : अंधारलेल्‍या आयुष्यात दृष्टिबाधितांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. आयुष्याला आकार देण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी शिक्षणातही दृष्टिबाधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुखकर करताना त्यांच्यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने ज्ञानदानाचा यज्ञ मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या केटीएचएम महाविद्यालयाने अविरतपणे सुरू ठेवला आहे. (Giving knowledge to visually impaired people Initiative of KTHM students gaining fame Nashik News)

राज्‍यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्‍था असलेल्‍या ‘मविप्र’च्या ‍माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोचले आहे. संस्‍थेच्‍या गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात पदवी, पदविका, पदव्‍युत्तर पदवीसह अन्‍य विविध अभ्यासक्रम उपलब्‍ध आहेत.

विद्यार्थी संख्येच्‍या दृष्टीने परदेशातील एखाद्या विद्यापीठाइतके विद्यार्थी एकट्या या महाविद्यालयात शिकत असल्‍याचे बोलले जाते. संख्यात्‍मक पातळीवर आघाडीवर असलेले महाविद्यालय गुणात्‍मक पातळीवरही अग्रस्‍थानी आहे.

महाविद्यालयातर्फे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्‍या शिक्षणाची विशेष सुविधा करण्यात आली आहे. संगणक, व अन्‍य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासह यथोचित यश मिळविण्यासाठी प्रोत्‍साहित केले जात आहे.

दहा रुपयांत मिळतो प्रवेश..

दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अवघ्या दहा रुपये शुल्‍कात प्रवेश दिला जातो. सामाजिक बांधिलकी म्‍हणून उर्वरित शैक्षणिक शुल्‍क संस्‍था उचलत असते. या योजनेचा दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना फायदा होत असून, दर वर्षी सुमारे शंभर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना पुरविल्‍या जाणाऱ्या सुविधा...

- या विद्यार्थ्यांसाठी पाच संगणक व हेडफोन उपलब्‍ध.

- जॉब ॲक्‍सेस विथ स्‍पीच प्रोफेशनल व्‍ही पॉइंट १७

(जेएडब्‍ल्‍यूएस) या आधुनिक सॉफ्टवेअरचा होतोय फायदा.

- यशोवाणीच्‍या सहकार्याने दोन हजार ऑडिओ बुक्‍स उपलब्‍ध

- बुक बँक संकल्‍पनेतून दिला जातोय पुस्‍तकांचा सेट

- स्‍पर्धा परीक्षेसह अन्‍य विविध विषयांचे दीडशेहून अधिक ब्रेल बुक्‍स.

- ब्रेल रिलायन्‍स, दृष्टी स्‍पर्शज्ञान यांसह मासिके उपलब्‍ध.

- ८ जीबी मेमरी कार्ड व ब्रेल वर्ड की असलेले १२ डॉट मिनी डिव्‍हाइस अभ्यासासाठी ठरते उपयुक्‍त.

- कीबो एक्‍स डिव्‍हाइसद्वारे पुस्‍तकाची पाने स्‍कॅन करून ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करते उपलब्‍ध.

- सारथी डिव्‍हाइसचा अभ्यासासाठी होतोय भरपूर फायदा.

"दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्‍या मुख्य प्रवाहात आणताना महाविद्यालयातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी उपयोग होत आहे. बँकिंग, सनदी लेखापाल व अन्‍य विविध शाखांमध्ये दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यापुढील सर्वोतपरी सहकार्य केले जाईल.' - प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, केटीएचएम महाविद्यालय.

"बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्‍या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य संस्‍थेमार्फत घडत आहे. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्‍या संधी उपलब्‍ध करून देताना नाममात्र शुल्‍कात शिक्षणाची संधी संस्‍थेमार्फत उपलब्‍ध झाली आहे. या योजनेतून दर वर्षी सुमारे शंभर विद्यार्थी शिक्षण घेताना उज्‍ज्‍वल करिअर घडवत असल्‍याने समाधान वाटते."

- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

ज्ञानग्रहणाचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित

महात्‍मा जोतिराव फुले यांनीही विद्येचे महत्त्व विशद केले आहे. ‘विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’ हे महात्मा फुलेंचे वाक्‍य आजच्‍या काळातही समर्पक ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT