Reservoir now smoothed out by the continuous flow of water from the dam after the incident of dumping of chemicals in the riverbed.
Reservoir now smoothed out by the continuous flow of water from the dam after the incident of dumping of chemicals in the riverbed. esakal
नाशिक

Nashik News : खेडलेझुंगेत गोदापात्र पुन्हा झाले नितळ; सतत प्रवाहित जलस्त्रोतांतून साधला परिणाम

सकाळ वृत्तसेवा

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : खेडलेझुंगे (ता. निफाड) येथील गोदावरी नदीपात्रात रासायनिक द्रव्ये टाकल्याच्या घटनेला आठ दिवस झाल्यानंतर आता गोदापात्रातील विस्तीर्ण जलाशय साठा स्वच्छ झाला आहे.

साठवण बंधाऱ्यातील नैसर्गिकरित्या झिरपून येणाऱ्या जलस्त्रोतांनी हे जलाशय नितळ केले असून, कुठेही रासायनिक द्रव्यामुळे येणारा गडद हिरव्या रंगाचा थर अन् छटा दिसत नाही. (Godapatra became smooth again in Khedlezunge Results obtained from continuously flowing water sources Nashik News)

नाशिकच्या प्रदुषण नियंत्रण शाखेच्या पथकाने हिरवट रंगाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. मात्र, त्याचा अहवाल आठ दिवसानंतरही आलेला नाही. गेल्या सोमवारी (ता. १५) खेडलेझुंगे येथे गोदापात्रात रासायनिक द्रव्ये टाकण्यात आली होती.

यापूर्वीही तीन वेळा असा प्रकार उघडकीस आलेला आहे. खेडलेझुंगे ते कानदळ गावापर्यंत सुमारे दोन किलोमीटर परिघात या रासायनिक द्रव्यांचा परिणाम झाला. येथील आल्हाददायक वातावरणात हवेची झुळूक येताच पांढऱ्या रंगाच्या लाटा निर्माण होऊन पाण्याचा रंग बदलत होता. त्यावर हिरव्या रंगाची छटा उमटत होती.

आता मात्र येथील विस्तीर्ण जलाशय नितळ झालेला आहे. रविवारी (ता. २१) लग्नाची तारीख व सुट्टीचा दिवस असल्याने अनेक कुटुंबियांनी खेडलेझुंगे पुलावर थांबा घेऊन ‘सेल्फी विथ गोदामाई’चा आनंद लुटला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिन्नर, निफाड, धुळे बायपासला जाणारे अनेक कुटुंबिय निसर्गाचे सानिध्य व नितळ जलाशयाचा आनंद घेत होते. रखरखीत उन्हाळ्यात संतवन व परिसरातील प्रेक्षणीय स्थळ पाहताना झाडांचा आडोसा घेतला जात होता.

"खेडलेझुंगेला गोदावरी नदीपात्रात पुन्हा कुणीही रासायनिक द्रव्ये टाकू नयेत. गावाचे नैसर्गिक सौंदर्य प्रदुषित करू नये. संतवन व गोदावरी परिसरातील प्रेक्षणीय सौंदर्यांचा आनंद घ्यावा."

-रामदास गोरडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, खेडलेझुंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT