Godavari
Godavari Sakal
नाशिक

वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदापात्रात; नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदापात्रात मिसळू नये म्हणून टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत तिला गोदेला समांतर नाला खोदला आहे. परंतु, या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने त्याचे पाणी थेट गोदापात्रात मिसळून नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. म्हसरूळकडून येणारा वाघाडी नाला व पंचवटीतील काही गटारी थेट गोदापात्रात मिसळू नये, म्हणून गाडगे महाराज पुलापासून गोदावरीला समांतर नाला खोदण्यात आला आहे. (Godavari river pollution sewage water is being mixed directly in the river basin)


पुढे या नाल्यांचे पाणी पंपिंग करून फिल्टरेशन प्लॅन्टकडे नेले जाते. परंतु टाळकुटेश्‍वर पुलाखालीच या नाल्यात कचरा साचला आहे. त्यामुळे त्याचा प्रवाह बंद होऊन ते पाणी गोदापात्रात मिसळते. याशिवाय जुन्या काझी गढीच्या बाजूने येणारा एक सांडपाण्याचा लाईन थेट गोदापात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीपात्राच्या या पुढील भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली असून, पानवेलीही वाढल्या आहेत. नाल्यातील पाण्यावर मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक, थर्माकोलसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. खोदलेला हा नाला नदीपात्रापेक्षा उंच आहे. त्यामुळे त्यातील पाणी थेट नदीपात्रात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.

गोदा की गटारगंगा

कोरोनामुळे सध्या अन्य पर्यटनासह धार्मिक पर्यटनाला मज्जाव केला आहे. त्यामुळे बारमाही गजबज असलेल्या तपोवनात मोजके पर्यटक फिरायला जातात. मात्र, नदीपात्रात गटारी मिसळत असल्याने तपोवनातील नदीपात्रातील पाण्याला उग्र दर्प येतो. याशिवाय या भागात नदीपात्रात पानवेलीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. सध्या कामामुळे गोदावरी प्रवाही नाही, त्यातच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गटारी मिसळत असल्याने पानवेलीही वाढल्या आहेत.

पावसाळी कामे कधी?

पावसाळ्याला सुरवात झाली असून, दर पावसाळ्यापूर्वी इतर गटारींसाठी वाघाडीची साफसफाई होते. यावर्षी मनपाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाघाडी नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. गोदा प्रवाही नसलीतरी गटारांमुळे वाघाडी मात्र प्रवाही आहे, त्यामुळे वाघाडीतील हाच कचरा पुढे गोदापात्रात मिसळून गोदावरीचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे गोदावरीबरोबरच वाघाडी नाल्याचीही स्वच्छता होणे गरजेचे होते.

प्रशासनाला वारंवार विनंती करूनही वाघाडीचे पाणी गोदावरीत मिसळणे सुरूच आहे. नदीचे प्रदूषण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खरेतर फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत.
- निशिकांत पगारे, याचिकाकर्ते, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच

(Godavari river pollution sewage water is being mixed directly in the river basin)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: तो डिनर प्लॅन केला नसता तर ? पुण्यातील पोर्शे अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं

उमेदवाराला विरोध म्हणून विद्यमान खासदाराने मतदान सुद्धा केले नाही! भाजपने पाठवली कारणे दाखवा नोटीस

Pune Porsche Car Accident: पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अन्यथा...; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update: पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT