ZP election Nashik news esakal
नाशिक

गितेंनी कोणत्याही गटातून उमेदवारी करावी; कार्यकर्त्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमुळे निफाड तालुक्यातील मातब्बर नेत्यांपुढे उमेदवारीचा अवघड पेच निर्माण झाला आहे. यात सायखेडा गटात युवकांचे मोठे जाळे निर्माण करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज असलेले पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे माजी संचालक गोकूळ गिते यांची संधी हुकणार असल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

कुठल्याही गटातून तुम्ही उमेदवारी करावी, अशी गळ या कार्यकर्त्यांनी त्यांना घातली आहे. त्यामुळे गिते आता कोणत्या गटातून उमेदवारी करणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (Gokul Gite should apply from any group Workers demand nashik political Latest Marathi News)

आरक्षणाचा विचार केला तर निफाड तालुक्यातील दहा गटांपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील एकाही उमेदवाराला संधी नाही. लासलगाव गट फक्त सर्वसाधारण महिला राखीव आहे. चांदोरी गटात सिद्धार्थ वनारसे आणि सायखेडा गटात गोकूळ गिते यांची निराशा झाली.

सायखेडा गटात गोकूळ गिते यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून युवकांचे जाळे निर्माण केले. त्यांना संधी देवून एकप्रकारे जिल्हा परिषद निवडणुकीची पेरणी केलेली असताना आरक्षणामुळे पेच निर्माण झाला आहे.

कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी करा पण ‘मिनी मंत्रालय’ गाठा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, आत्ताच कुठलीही भूमिका घेण्यास गोकूळ गिते यांनी नकार दिल्यामुळे युवकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो.

पाच वर्षे जोरदार तयारी केल्यानंतर आरक्षणामुळे संबंधित गटामध्ये उमेदवारी करता येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोकूळ गिते आता कार्यकर्त्यांचा आग्रह लावून धरतात की जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी सोडून देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

गिते यांच्या निर्णयाकडे लक्ष

ज्या सायखेडा गटामध्ये गत पाच वर्षांपासून कामे केली, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले, त्याच गटात आरक्षणामुळे संधी हुकल्याने गोकूळ गिते यांनी दिंडोरी किंवा पेठ तालुक्यातील एखाद्या गटातून उमेदवारी करावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी त्यांना घातली आहे.

यात अहिवंतवाडी गट गिते यांच्यासाठी 'सेफ झोन' असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र गोकूळ गिते काय निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT