Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकमधून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दिड लाखांचा माल लांबवल्याची घटना घडली. (Goods worth one half lakh stolen from standing truck Nashik Latest Crime News)

माणिक बाबुराव सराटे हे अहमदनगर येथील ट्रान्सपोर्टवरुन आपला ट्रक क्र. एम. एच. 12/ एफ. सी. 7656 घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास गुरेवाडी शिवारात आला असता चालकाने जेवणासाठी ट्रक येथील स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ उभा केला होता. तेथे जेवण केल्यानंतर चालक ट्रकच्या केबिनमध्येच झोपले. रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी संधी साधत गाडीच्या पाठीमागील बाजूची ताडपत्री कापून कापून ट्रकमधील मेडीसीन, कपड्याच्या गाठी व सिगारेट असलेले दिड लाखांचा मुद्देमाल लंपास केले.

सकाळी चालक उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

VIDEO : खऱ्या प्रेमाचं जिवंत उदाहरण! अपंग पतीला काखेत उचलून घेत महिलेचा ट्रेनने प्रवास; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणाचा फटका! 50% वर्क फ्रॉम होम बंधनकारक; बांधकाम मजुरांना मिळणार 10 हजारांची मदत

SCROLL FOR NEXT