simple wedding.jpg 
नाशिक

साखरपुड्याला गेले अन्‌ नवरीच घेऊन परतले..!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ नांदूरमध्यमेश्‍वर : ना लग्नपत्रिका, ना वरमाईचा मानपान, ना बॅन्डबाजा, ना फेटे... लग्नकार्यातील या सर्व अनावश्‍यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्‍य असताना दोन्ही परिवार, वधू-वराच्या आग्रहाने साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मध्यस्थांनी मांडताच शुभम व रोहिणीच्या सातजन्माच्या गाठी बांधल्या गेल्या. 

लग्नाच्या पुढील तयारीची चर्चा सुरू असताच...

नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) येथील द्राक्ष बागायतदार रावसाहेब शिंदे यांचा मुलगा शुभम आणि भवरी (ता. नांदगाव) येथील जिभाऊ हिरे यांची मुलगी रोहिणी यांची वधू-वर पसंती होऊन साखरपुडा पार पडला. त्याचवेळी नातेवाईक व मध्यस्थी मंडळी जमा झाली आणि लग्नाच्या पुढील तयारीची चर्चा सुरू असताच माजी जिल्हा परिषद सदस्य हरिश्‍चंद्र भवर यांनी अनावश्‍यक खर्चाला फाटा देत हे लग्न आताच उरकून घ्यावे, असा प्रस्ताव मांडताच शिंदे व हिरे यांच्यासह वधू आणि वराने देखील होकार दिला.

त्यानंतर अवघ्या काही वेळेतच ना मानपान, ना रुसवे-फुगवे, शिवाय साधेपणाने भवरीत शिंदे-हिरे विवाह सोहळा पार पडला. साखरपुड्याला गेलेले शिंदे परिवार नवरी घेऊनच नांदूरमध्यमेश्‍वरला आल्याने गावात अनेकांना सुखद धक्का बसला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT