bhujbal koshyari 1.jpg esakal
नाशिक

राज्यपाल कोश्यारी अन् पालकमंत्री भुजबळांमध्ये रंगली जुगलबंदी

महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ व राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणातील परस्‍परांना चिमटे काढले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने आज (ता.९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच राजकीय चिमट्यांची जुगलबंदी उपस्थितांना अनुभवयास मिळाली.
महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्री. भुजबळ व राज्यपाल कोश्यारी यांच्या भाषणातील परस्‍परांना चिमटे काढले. कार्यक्रमानंतरही उभयामधील चिमट्यांची चांगलीच चर्चा रंगली.

...पण राज्यपालांच्या तोंडावर मुखपट्टी - भुजबळ

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, नाशिक इतके शांत आहे की, प्रभू श्रीराम राम फूल फॅमिली येथे राहिले. राज्यपालांनी नाशिकला रहायला यावे. असे निमंत्रण दिलेच सोबतच प्रभू श्रीरामांच्या नावाचा उपयोग लोक कशा-कशासाठी करतात. असे म्हणत पण आमच्या नाशिकच्या उद्योजक राम बंधूनी मात्र प्रभू रामांच्या नावाचा उपयोग चांगल्यासाठी केला. अनेकांना रोजगार देत महाराष्ट्रात मोठा विस्तार वाढविला, अशी धडाकेबाज सुरवात केली. कोरोनातील मास्कचा संदर्भ देताना ते म्हणाले की, मास्कमुळे तोंड दिसत नाही. लोकांना उत्तर द्यावे लागत नाही. देणेकऱ्यांना टाळता येते, असे सांगताना भाषणाच्या ओघात विषय नोटाबंदीपर्यत नेला. नोटाबंदी आणि कोरोना संदर्भाचा लकब वापरून संदर्भ जोडत ते म्हणाले की, देशात नोटा बंदीमुळे अनेकांचे व्यवसाय मोडून पडले. अनेक कुटुंब उन्मळून पडले. पण राज्यपालांनी तोंडाला लावलेल्या पट्टीकडे पाहत राज्यपालांनी पण तोंडावर मास्क लावला आहे. ते आमचे चांगले मित्र असले तरी राजकीय मात्र काहीच ऐकत नाही, असा चिमटा काढला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी मास्क काढत भुजबळांच्या विनोदाला दाद दिली.

भुजबळांचा संघर्ष मोठाच पण..... - राज्यपाल

अखेरच्या भाषण करतांना राज्यपाल कोश्यारी यांनीही त्यांच्या भाषणात भुजबळांना चिमटे काढले. जे जे मुंबई पुण्याला ते नाशिकला हवे या भुजबळांच्या मागणीचा संदर्भ देत त्यांनी असेच एक नेते उत्तराखंडला आहे. त्यांना जे चांगले आहे ते हवे असायचे पण अवकाळी गारा आणि उल्का सुद्धा त्यांना त्यांच्या मतदार संघात हव्या असायच्या. त्यानंतर मी आतापर्यंत फक्त विदर्भ आणि मराठवाडा अविकसित असल्याचे ऐकले. पण आता उत्तर महाराष्ट्रही अविकसित असल्याचे भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकले. म्हणजे आत्तापर्यंत बहुदा फक्त पश्चिम महाराष्ट्रातच विकास झाला का, असे भुजबळांकडे पाहात प्रश्न केला. भुजबळांना वेदना जास्त कळतात. कारण संघर्ष करणाऱ्यांना वेदना जास्त कळतात. भुजबळांनी आयुष्यात संर्घषच जास्त केला त्यातुलनेत शिक्षण कमी झाले. राज्यपालांनी भाषणात मुहुर्ताचे महत्त्व सांगताना मुहूर्तावर विश्वास नाही, असे म्हणणारेही चांगल्या कामासाठी चांगले मुहूर्त शोधतात. काही कम्युनिस्ट नेत्यांची उदाहरण आहे, असे म्हणत भुजबळ साहेब आपण मुहूर्तावर विश्वास ठेवता का? असे विचारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT