Approval  esakal
नाशिक

Nashik News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी; म्हसरुळमधील 14 हेक्टर जमीन हस्तांरणास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे विद्यापीठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता मिळाली आहे.

त्यासाठी नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यांच्या विस्तारीकरणासाठी म्हसरुळ येथील सर्व्हे नं. २५७ मधील १४ हेक्टर ३१ आर जागा हस्तांतरण करण्यास आज (ता.२०) मंजुरी मिळाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. (Govt Medical College Approval for transfer of 14 hectares of land in Mhasrul Nashik News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय विद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

तसेच पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT