Satyajeet Tambe Esakal
नाशिक

Graduate Constituency Election : प्रत्येक पदवीधरचा जिव्हाळ्याचा मित्र बनणार - सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बारा वर्षाच्या कारकिर्दीत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा आपण सिद्ध करतं पाचही जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांचा विश्वास सार्थ करून सर्वांचा नेता नव्हे नवा मित्र बनणार असल्याचा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर संगमनेर राहता राहुरी येथील नागरिकांशी संवाद साधताना सत्यजित तांबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. परंतु सरकार नवीन नोकर भरती करण्यासाठी उदासीन आहे.

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर यावल भुसावळ जामनेर चाळीसगाव येथे मतदारांशी संवाद साधल्यानंतर नगर जिल्ह्यातील पदवीधरांशी संवाद साधला. तांबे म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघ हा विस्तीर्ण मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात ५४ तालुके येत असूनही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्येक तालुक्यातील नागरिकांशी नाते जोडल्याने मतदारसंघ व तांबे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. अपक्ष म्हणून उमेदवार असलो तरी पक्षविरहित सर्व लोक एकत्र येऊन आपल्याला पाठिंबा देत आहेत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन पाचही जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास आपण सार्थ ठरवून प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा नवा मित्र बनविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार

आगामी काळात सर्वात महत्त्वाचा जुन्या पेन्शनसाठीचा प्रश्न मार्गी लावण्यास आपला प्राधान्य राहील. जुन्या पेन्शन बाबत काही शासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारला चुकीची आकडेवारी दिली जात असून याचा बोजा शासकीय तिजोरीवर न पडता ते टप्प्याटप्प्याने पडणार आहे .

छत्तीसगड आणि राजस्थानचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्यासाठी आपण स्वतः एका वरिष्ठ शिष्ट मंडळासह जाऊन शासनाला ही पटवून देणार आहोत. जुन्या पेन्शन योजना मार्गे लागल्यास राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.

करिअर मार्गदर्शनासाठी विशेष पॅटर्न

विभागातील पाचही जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी शाळा ऑनलाइन पद्धतीने एकत्र जोडून करिअर मार्गदर्शन बाबत एक विशेष पॅटर्न राबविला जाणार आहे. बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा निहाय ज्या एमआयडीसी आहेत त्यामध्ये अधिक सुविधा निर्माण करून चांगले उद्योग आणण्यास प्राधान्य राहणार असल्याचे श्री. तांबे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT