Bhausaheb Harle, Pradeep Muthal, Ravindra Muthal, Ganesh Muthal while felicitating Shewantabai Muthal Aji, who was directly elected as Sarpanch. esakal
नाशिक

Gram Panchayat Election : 75 वर्षांच्या आजी बनल्या वडगाव पिंगळाच्या सरपंच!

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी (जि. नाशिक) : सामाजिक बांधिलकी जपणारे माणसे अन् कुटूंब फारसे राजकारणात येत नाहीत. पण लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात येऊन थेट जनतेतून सरपंच होतात. ते त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाची पावती जनमत देते त्यामुळेच.

वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील पंच्याहत्तर वर्षांच्या शेवंताबाई मुठाळ ऊर्फ मुठाळ आजी या ग्रामस्थांच्या अशाच प्रेमातून थेट जनतेतून सरपंच निवडून आल्या आहेत. मतदारांनी एकप्रकारे या कुटुंबाप्रति कृतज्ञताच व्यक्त केली आहे. (Gram Panchayat Election 75 year old grandmother became Sarpanch of Vadgaon Pingala nashik news)

विशेष म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्डात उमेदवारी करून अवघ्या सहा मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आता थेट जनतेतून सरपंच पदाच्या चौरंगी लढतीत ५०४ मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी, कामांचा डोंगर लोकांपुढे मांडला. सरपंच शेवंताबाई मुठाळ यांना शेतकरी बाळासाहेब व केरू ही मुलगे आहे. लहान दत्तात्रय मुठाळ सामाजिक कार्यकर्ते आहेत.

शाळेत व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष असताना इमारतींना नवीन झळाळी मिळवून देत त्यांनी रूपडंच बदलवले आहे. त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढून शाळाविकास वडगाव पिंगळाकरांनी अनुभवला आहे. गावाची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध नवतरुण अशी झाली आहे. सरपंचपदासह नऊ जागा जिंकल्या आहेत, ‘परिवर्तन’ला दोन जागा मिळाल्या आहेत. जय बजरंग पॅनलला एकही जागा मिळालेली नाही.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

‘ग्रामविकास’चे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मुठाळ, वैभवी मुठाळ, बेबी नागरे, सुदाम सानप, खंडेराव विंचू, इंदूबाई सानप, मंदा भवार, गोकुळ मुठाळ, सचिन मुठाळ विजयी झाले. ‘परिवर्तन’चे ग्रामपंचायत सदस्य बिजला पवार, शारदा सांगळे विजयी झाले. सामाजिक कामांच्या उल्लेखनीय कामगिरींनी सहज विजयी होता येते. चांगले काम जनता लक्षात ठेवत असते, हे वडगाव पिंगळाच्या चौरंगी सरपंचपदाच्या शर्यतीतून दिसले.

"वडगाव पिंगळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची प्रशस्त इमारत बांधकाम पूर्ण करून चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करू. विद्यालयाचा प्रश्न मार्गी लावणार."

- शेवंताबाई मुठाळ, नवनिर्वाचित सरपंच, वडगाव पिंगळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT