Shobha Gaikwad esakal
नाशिक

Gram Panchayat Election :...अन् शाळेत पोषण आहार शिजवणारी महिला झाली सरपंच!

मनोहर शेवाळे

जायखेडा (जि. नाशिक) : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील थेट सरपंचपदाची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली . या निवडणुकीत शोभा निवृत्ती गायकवाड यांनी १६६२ मते मिळून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मीना चेतन अहिरे यांच्यावर ५३ मतांची आघाडी मिळवून दणदणीत विजय संपादीत केला. (Gram Panchayat Election shobha gaikwad cooks nutritious food in school becomes Sarpanch of jaykheda nashik news)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

जायखेडा सरपंचपद हे अनुसूचित जमाती साठी राखीव असल्यानेे त्यासाठी ५ उमेदवार रिंगणात आपले नशीब अजमावत होते. मात्र जायखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या शोभा गायकवाड यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व आपल्या समाज कार्यामुळे त्यांना मतदारांनी भरघोस मतं देत विजयी केले. कुठलीही निवडणूक म्हटली की पैसा लागतो त्या शिवाय निवडणूक लढणे शक्य नाही.

असे असले तरी माणसाचे कार्य व स्वभाव चांगला असले तर अशा वेळेस पैसाही कमी असला तरी चांगल्या माणसाला आजही किंमत आहे हे या निवडणुकीतुन जनतेने दाखवून दिले असे शोभा गायकवाड यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्यांच्या या विजयामुळे सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT