Newly elected sarpanch and supporters cheering outside the tehsil office here after the gram panchayat results. esaka
नाशिक

Gram Panchayat Election : येवल्यात प्रस्थापितांना धक्का; नवोदित गावचे कारभारी!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : लक्षवेधी ठरलेले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला आहे. अनेक प्रस्थापितांना गावच्या राजकारणापासून दूर ठेवत नव्या व तरुण चेहऱ्यांच्या हाती सत्तेची चावी मतदारांनी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला दोन सरपंचपद मिळाले तर शिवसेना ठाकरे गटाला तीन ग्रामपंचायती मिळाल्याचे सांगण्यात येते.

दोन ठिकाणच्या सरपंचांनी आम्ही कोणाचेच नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान चांदगाव येथे विजयी झालेले प्रणव साळवे हे सर्वात तरुण (वय २१) सरपंच म्हणून विराजमान झाले आहे. (Gram Panchayat Election shock to established new elected at yeola nashik news)

गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी नेत्यांचे गट तेच असले तरी बहुतांशी उमेदवार नवे चेहरेच रिंगणात होते. त्यातही सर्वत्र जुन्यांना डावलून नव्याच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवल्याचे आजच्या निकालाने दाखविले आहे. विशेष म्हणजे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला दोनच ठिकाणी सत्ता मिळविता आली आहे तर दोन ठिकाणी अपक्ष यांनी बाजी मारली असताना यातील एका जागेवर भाजपने दावा केला आहे.

शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांचे कट्टर समर्थक युवा नेते कांतिलाल साळवे व पंचायत समितीच्या माजी सभापती आशा साळवे यांचे पुतणे प्रणव साळवे यांनी चांदगाव ग्रामपंचायतीत एकतर्फी विजय मिळविला आहे. कांतिलाल साळवे यांचे चुलत बंधू सुनील साळवे यांनी नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. कुसुर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संभाजी पवारांचे समर्थक दिलीप मेंगाळ यांच्या गटाच्या सुरेखा गायकवाड यांची यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. या तीनही ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीसाठी कोटमगाव बुद्रूक येथील निकाल धक्कादायक मानला जात आहे. येथे राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांचा तब्बल ५६० मतांनी पराभव झाला आहे.या निकालाची तालुक्यात जोरदार चर्चा झाली. आडगाव चोथवा येथे कापसे पैठणीचे संचालक दिलीप खोकले यांचे पुतणे रामकृष्ण खोकले यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.मात्र खोकले यांनी कुठल्याही पक्षाचे बॅनर लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एरंडगाव येथील निकालावर राष्ट्रवादीसह शिवसेनेने दावा सांगितला आहे.

आम्ही कुणाचेच नाही

आजच्या निकालानंतर नवनिर्वाचित सरपंच व समर्थकांना फोन करून पक्षाबाबत विचारले असता,आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही,निवडून येईपर्यंत आम्हाला कुठल्याही पक्षाने व नेत्यांनी कुठलीही मदत केलेली नाही.त्यामुळे आमच्या नावापुढे कुठल्याही पक्षाचा शिक्का लावू नका.आमचे सर्व नेत्यांशी चांगले संबंध असल्याची प्रतिक्रिया दिली.

दावे-प्रतिदावे गमतीचा विषय

आजच्या निकालानंतर भाजप राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गटाने विविध सरपंचपदावर दावे केले. विशेष म्हणजे कुठल्याही सरपंचाने पुढे येऊन माध्यमांसमोर आम्ही कुठल्या पक्षाचे हे जाहीर केलेले नाही. कोटमगाव बुद्रूक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांचा पराभव झाला तर विजयी झालेले श्री. काकळीज यांचा येथील राजकारणाशी कुठलाही संबंध नसून ते नाशिक येथे व्यावसायिक आहेत. असे असताना राष्ट्रवादीचा पराभव होऊनही राष्ट्रवादीच्या वतीने येथे राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...- गावांना मिळालेले सरपंच

कुसुर प्रियांका गायकवाड

चांदगाव प्रणव साळवे

नायगव्हाण सुनील साळवे

कोटमगाव राजेंद्र काकळीज

आडगाव चोथवा रामकृष्ण खोकले

एरंडगाव खुर्द योगिता खापरे

नादेसर सुनीता जाधव

ग्रामपंचायत निकाल असा -

चांदगाव : सदस्यपदी छाया गोराणे, संगीता साळवे, प्रदीप अहिरे, रवींद्र गोराणे, सुनीता गोराणे हे विजयी.

नायगव्हाण : निलेश जोरवर, संतोष सदगीर, नितेश सदगीर, कोमल पानपाटील विजयी.

कुसूर : सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. दीपक गायकवाड, लता गायकवाड विजयी.

कोटमगाव बुद्रुक : शारदा बिलवरे, सविता वाघमोडे, सचिन ढमाले, मीना माळी, भागवत कोटमे, मंगला पाटील विजयी.

आडगाव चोथवा : शिवाजी खोकले, मंगल घोडेराव, अर्चना खोकले, मेघा आहेर, सुनीता पवार, कचरू खोकले, दिलीप पवार, कांताबाई आहेर विजयी.

एरंडगाव खुर्द : सदस्यपदी अतुल पडोळ, रेणुका पाटील, भास्कर पडोळ हे विजयी झाले तर इतर सहा जण बिनविरोध निवडले आहेत.

नांदेसर : सदस्यपदी लंका कापसे, हीना शेख, विलास मोरे, जायदा शेख, रेखा आहेर यांनी विजय मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT