nmc 123.jpg 
नाशिक

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना लाभ

विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा गडगडला तरी कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाने दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांच्यात बुधवारी (ता. २८) झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला. महापालिका आस्थापनेवरील चार हजार ७५५ कर्मचारी, अस्थायी दीड हजार अशा साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. 

चौदा हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर;
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दर वर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची परंपरा आहे. या वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने महापालिकेच्या महसुली खर्चात वाढ होणार आहे. त्याशिवाय कोरोनामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली समाधानकारक होत नसल्याने दिवाळी सानुग्रह अनुदान मिळेल की नाही याबाबत अनिश्‍चितता होती; परंतु महासभेने यापूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मंजूर केल्याने प्रशासनाला अंमलबजावणी करणे भाग होते. आयुक्त जाधव यांनी सात हजार रुपये अनुदान देण्यास संमती दर्शविली होती.

स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांना लाभ 

महापौर कुलकर्णी यांच्यासह स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. आस्थापनेवरील चार हजार ७५५ अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ६८९ अंगणवाडीसेविका, शंभर कंत्राटी कर्मचारी, ९३५ शिक्षकांना सानुग्रह अनुदान मिळेल. नोव्हेंबरच्या वेतनाबरोबर बॅंक खात्यात जमा होईल. 

आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी कोविड प्रादुर्भावाच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याने त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे कर्तव्य पार पाडले. -सतीश कुलकर्णी, महापौर 

कोरोनाकाळात चांगले काम केल्याने सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी आनंदाने याचा स्वीकार करून अधिक चांगले काम करावे. -कैलास जाधव, आयुक्त 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT