grapes.jpg 
नाशिक

मागील वर्षाच्या तुलनेत द्राक्ष निर्यातीत चक्क 'इतकी' घट...!

अरुण खांगळ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (लासलगाव) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा उशिराने सुरवात झाली. जानेवारीपासून द्राक्ष निर्यात दमदार सुरू असून, मंगळवार (ता. 10)पर्यंत 60 हजार 630 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. या हंगामात सुरवातीला अवकाळी आणि लांबलेल्या पावसाने काहीकाळ निर्यात मंदावली होती. मागील वर्षाच्या तुलनेत द्राक्ष निर्यातीत 16 टक्के घट झाली आहे. 

कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती

हंगामाच्या सुरवातीला लांबलेला पाऊस आणि नंतर अवकाळीमुळे द्राक्ष निर्यात मंदावली होती. नंतर द्राक्ष उत्पादकांच्या यशस्वी प्रयत्नांतून दर्जेदार द्राक्ष उत्पादनास निर्यातीची आशादायी स्थिती तयार झाली. नेदरलॅंड, जर्मनी, युनायटेड किंगडम, रशिया, कॅनडा, चीन, डेन्मार्क, फिनलॅंड आदी देशांत द्राक्षाला अधिक मागणी होती. आतापर्यंत 18 देशांत नाशिकमधून द्राक्ष निर्यात झाली आहे. नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी देशांत पाठविण्यात येतात. जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहावी, यासाठी कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती केली. तसेच निर्यातीचे निकष तपासून काटेकोरपणे काम केले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे 33 हजार 567 द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. 

निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता कायमच

गुणवत्ता वाढली, तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील, तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. गेल्या वर्षी द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. मात्र, या हंगामात परतीचा पाऊस, ओखी वादळातून मोठा खर्च करून हे पीक वाचविले आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादनखर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दीने द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी विशेषतः नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना वाढती मागणी आहे. 

10 मार्चपर्यंत प्रमुख देशांतील द्राक्ष निर्यात 

नेदरलॅंड ----- 2,986 कंटेनर - 40,187 टन 
युनाइटेड किंडम ----- 539 कंटेनर -7,219 टन 
जर्मनी- 532 ----- कंटेनर - 7,045 टन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT