esakal
esakal
नाशिक

शिक्षणासाठी पायी निघालेल्या चिमुरडयांना गटशिक्षणाधिकारींनी दिले लेखी अश्वासन

पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद झाली आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद केल्याने पालकांसह ग्रामस्थ सुद्धा संतापले होते.

येथील पहिली ते चौथीचे चिमुरडे विद्यार्थी दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी शुक्रवार ( ता.५ रोजी ) सकाळी १ वाजता ५ कि.मी.अंतर पायी येत असतांना गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी त्यांना रस्त्यावर थांबवून लेखी आवाश्वन देऊन शाळा सुरु करु असे सांगितल्याने आंदोलन तृर्तास स्थगित करण्यात आले आहे. (group education officer gave written assurance to children who left for education from darewadi to igatpuri nashik Latest marathi news)

विशेष म्हणजे हि वेळच आली कशी असा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला.या शाळेत त्वरित आणखी एका शिक्षकाची नेमणुक करावी.आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवू नये, मर्जा प्रमाणे शिक्षकांना गाव, वर्ग देऊ नये.अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली.

उपाशीपोटी शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी पायपीट करत निघाले होते.यावर प्रशासन संबंधित अधिकारीवर कारवाई करेल का ? बेफिकीर शिक्षण प्रशासनाने शाळा बंद करण्याचा विचित्र निर्णय घेतल्याने सक्षम अधिकारी यांची नेमणुक करावी.अशी मागणी आता तालुक्यातुन होत आहे.

तर नशिकहुन नोकरी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी ५ कि.मी.पर्यंत पायी चालत असलेल्या चिमुकडयांना त्याच शाळेचे शिक्षकांनी येऊन मुलांना सांगायला कि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊ नका आमची नोकरी जाईल.अशी विनवणी करत होते.तर गटशिक्षणाधिकारी यांनीतर लोटांगणच घेतले होते.

इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका आहे.येथील प्रत्येक शिक्षक हा आदिवासी भत्ता व निवास भत्ता घेतात मात्र शिक्षण विस्ताराधिकारी निव्वळ भटकण्यात पटाईत असून शाळांवर त्यांचे लक्ष नसल्याची तक्रार तालुक्यातील नागरिकांनी केली.

विस्ताराधिकारी मनमानी करून शाळा बंद करण्याचे अहवाल देत असल्याने पिंप्रीसदो येथे मुस्लिम बांधवांमध्येही संताप आहे.याबाबत शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची आजच भेट घेणार आहे.

एका आदिवासी दुर्गम शाळेतील एक शिक्षक बोरटेंभे शाळेत वर्ग केल्याने आणि दुसरा शिक्षक येतच नसल्याने त्या आदिवासी वाडीतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.तेथील विद्यार्थी शिक्षणापासून दुर होत असल्याबाबत खात्रीशीर वृत्त असून लवकरच दैनिक सकाळ आवाज उठवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT