happy farmer
happy farmer  esakal
नाशिक

पाणी पातळीमुळे रब्बी पिके जोरात; शेतकरी आनंदात

सकाळ वृत्तसेवा

येसगाव (जि. नाशिक) : गाव व परिसरात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. नदी- नाले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (K T Weir) पाझर तलाव, शेततळे भरलेले होते. गिरणा नदीला पाणी टिकून राहिले. खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात विहिरींना पाणी उतरले. पाण्याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी कांदा (भगवा) मोठ्या प्रमाणात घेतला आहे. कांद्याचे रोप कमी पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पिक घेण्यात आले आहे. या भागात गहू तरारला असून, पीक जोमात आहे.

गव्हाला चांगला बहरण्यासाठी ऊन- थंडी पोषक ठरली

काही ठिकाणी गहू पोग्यावर, ओंबीवर, काही ठिकाणी हुरड्यावर आलेला आहे. उर्वरित क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पिक लावले आहे. कांद्यापेक्षा गहू कमी पाण्यावर निघून येतो. शेतकऱ्यांनी आजपर्यंत गहू पिकास पेरणीपासून तर ओंब्या येईपर्यंत वेळेवर पाणी, खते, निंदणी व पोषक हवामान लाभल्याने शिवारात गहू जोमाने वाढला आहे. अद्याप पाण्याच्या दोन- तीन पाळ्या बाकी आहेत. गव्हाच्या पिकाला पाण्याची टच बसली तर गव्हाच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. परंतु, गिरणा नदीला पाणी तसेच, तलावांना व इतर ठिकाणी पाणी टिकून राहिल्याने सर्वत्र गहू तरारला आहे. कांद्याला भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी यंदा गव्हाच्या पिकाकडे पाहिजे तसा वळला नाही. कांद्याचा भाव मध्येच ऊसळी खात असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. गव्हाला चांगला बहर येण्यासाठी ऊन- थंडी पोषक ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

SCROLL FOR NEXT