Guardian Minister Dada Bhuse on Friday interacting with the students of the 'Super 50' initiative under the innovative initiative of Zilla Parishad. esakal
नाशिक

Dada Bhuse News: पालकमंत्री भुसे यांची ‘सुपर ५०’ उपक्रमास अचानक भेट

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमास गतवर्षी सुरवात झाली.

या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, या कोर्सला शुक्रवारी (ता. ६) पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट दिली. (Guardian Minister Bhuse surprise visit to Super 50 initiative nashik news)

भुसे यांनी संबंधित परिस्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाबाबत माहिती जाणून घेतली. पालकमंत्री भुसे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, की जगाशी स्पर्धा करायची असल्यास विद्यार्थ्यांनी कष्ट घेणे गरजेचे आहे. काही अडचणी असल्यास कधीही मला कॉल करा, असे आवाहनही त्यांनी केले.

येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढविली जाईल. आपल्याद्वारे गावातील, शेजारील आणि भावंडांनाही प्रेरणा मिळेल, अशा पद्धतीने शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण देत जेईई, सीईटी, नीट या परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे. जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना वर्ग, राहण्याची व्यवस्था तसेच आयआयटी, जेईईसाठी लागणारे संपूर्ण शिक्षण याठिकाणी एका छताखाली मिळत आहे. आडगावनजीक असलेल्या उपाध्ये महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT