chhagan bhujbal esakal
नाशिक

नाशिककरांनो सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय..

विनोद बेदरकर

नाशिक : शहर जिल्ह्यात निर्बंध शिथिल (lockdown) झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या (corona patients) वाढत आहे. संख्या हजाराच्या खाली येत नसून उलट या आठवड्यात शंभराने रुग्ण वाढले. त्यामुळे नागरिकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काळजी घ्यावी, नियमांचे कठोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोनाविषयी साप्ताहिक आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी अधिकारी होते.

राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

भुजबळ म्हणाले, ‘निर्बंध शिथिल झाल्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ऑक्सिजन बेडच्या वापराचे प्रमाण १.३५ टक्के, तर मृत्यूचे प्रमाण २.७ टक्के असले तरी रुग्णसंख्या हजाराच्या खाली नाही, हेही वास्तव आहे. उलट या आठवड्यात अकराशेच्या पुढे गेली आहे. तिसऱ्या लाटेच्या तोंडावर शहरात २८९, तर ग्रामीणला १३७ टन ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. ऑक्सिजन टॅंकरची संख्या पाचपर्यंत वाढविली आहे. लसीकरणाचे प्रमाण २८ टक्के आहे. टास्क फोर्सने राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाट्यगृह, शाळा आणि धार्मिक स्थळ मात्र बंदच राहातील, असेही स्पष्ट केले.

तारीख रुग्णसंख्या

३० जुलै १,०३०

८ ऑगस्ट १,०७६

१३ ऑगस्ट १,१२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT