Guardian Minister dada bhuse statement about Shri Saptshringigarh Development Plan to Chief Minister nashik news esakal
नाशिक

Nashik Dada Bhuse : श्री सप्तशृंगगड विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे : पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dada Bhuse : साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगगडाच्या विकास आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट करीत येत्या काही दिवसांत अंतिम मंजुरी होऊन कामांना सुरवात होणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. (Guardian Minister dada bhuse statement about Shri Saptshringigarh Development Plan to Chief Minister nashik news)

श्री. भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सप्तशृंगगड ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाच्या मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी विकास आराखडा शासनास सादर केला होता. उच्चाधिकार समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रक १२ जुलैला ग्रामविकास विभागाला सादर केला.

श्री सप्तशृंगगडावर मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे सुधारित आराखड्यात नमूद केलेल्या मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक असल्याने सुधारित आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही नवीन कामांचाही समावेश

श्री सप्तशृंगगडावर यात्रेकरिता २५ ते ३० लाख भाविक येतात. या क्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा आहे. क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी भाविकांसाठी मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तीर्थक्षेत्राचा २३ कोटींचा विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मूळ आराखड्यात बदल करून एकूण २० कोटी २५ लाखांचा सुधारित आराखडा शासनास सादर केला. आराखड्यात प्रस्तावित काही कामे इतर योजनांतून सुरू करण्यात आल्यामुळे संबंधित कामे वगळून, तसेच भाविकांच्या गरजा, मागणीनुसार काही नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Balance: PF खात्यात किती पैसे आहेत? फक्त एक मिस्ड कॉल द्या आणि लगेच मिळवा माहिती

Vaibhav Sooryavanshi: ना कोहली ना धोनी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'हा' दिग्गज ठरला सुपरहिरो; ज्याने बाउन्सरचा थरार सोपा केला!

Chanakya Relation Guide : तुम्ही जोडीदाराकडून 'या' 3 गोष्टींची अपेक्षा कधीच करू नका, नाहीतर तुमचं नातं हळू हळू होईल कमजोर

Latest Marathi News Live Update : सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

IND vs AFG: रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियाच्या ताफ्यात एन्ट्री! अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीपूर्वी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT