Guardian Minister Dada Bhuse speaking at the shortage review meeting held at Agrasen Bhavan in Malegaon, esakal
नाशिक

Dada Bhuse: टंचाई काळात पाण्याचे योग्य नियोजन करा : पालकमंत्री दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : तालुक्यातील संभाव्य टंचाईसदृश परिस्थिती पाहता टंचाईच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. प्रत्येक गावाने पाण्याचा वापर काळजीपूर्वक व काटेकोरपणे करावा. ज्या गावांमध्ये विहिरी, कूपनलिका नादुरुस्त आहेत ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी.

गुरांना चारा, पिण्याच्या पाण्याचे गावांना टँकर पुरवठा आदी कामांचे नियोजन काटेकोरपणे करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (ता.२१) येथे केले. (Guardian Minister Dada Bhuse statement Proper planning of water in times of scarcity nashik)

येथील अग्रसेन भवन येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, प्रांताधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, गटविकास अधिकारी भरत वेंदे, नाशिक जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे,

जलसंधारण विभागाचे उपअभियंता अंकिता वाघमारे, आर. व्ही. महाजन, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण पाटील, भिष्मा पाटील, वीजवितरण अधिकारी आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरंपच, मंडल अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे प्रमाण वाढले आहे.

खरीप हंगामात पिकांना पाणी न मिळाल्याने उत्पादन घटणार आहे. तालुक्यात एक रुपयात पीक विमा योजनेत ९३ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार विमा कंपन्यांना प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ करावी जेणेकरून विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत योग्य नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी. तालुक्यात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध असून आवश्यकतेनुसार युरिया व रासायनिक खतांचा वापर करावा.

पिकांचे पाण्याअभावी नुकसान होवू नये व पिकांना पुरेशे पाणी उपलब्ध होण्यासाठी वीज कंपनीने विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करावे अशा सूचना श्री. भुसे यांनी दिल्या यावेळी तालुक्यातील सरपंचांनी गावातील विविध समस्या श्री. भुसे यांच्याकडे मांडल्या. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT