Guardian Secretary  Sakal
नाशिक

तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता होणार तिप्पट

विनोद बेदरकर


नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपुर्वी जिल्ह्यातील ॲक्सीजनची क्षमता तिप्पट म्हणजे साधारण ४०० मेट्रीक टनापर्यत क्षमता वाढविण्याचे निर्देश राज्याचे प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व नाशिकचे पालक सचिव आनंद लिमये यांनी दिले. (Guardian Secretary Instructed to increase oxygen capacity before the third wave of corona)



मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या जागेवर पालक सचिव म्हणून लिमये यांच्याकडे जबाबदारी आली असून लिमये यांनी आज पहिली बैठक घेतली. पहिल्या वहिल्या आढावा बैठकीत, लिमये यांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यातील कामकाजाचे सादरीकरण केले. त्यात, कोरोना, तिसऱ्या लाटेची तयारी, रुग्णवाहिंकाचा विषय, पीक कर्जाचे वाटप आरोग्य केंद्राच्या तयारीची माहीती घेतली. तिसऱ्या लाटेच्या तोंडावर १ हजार बेडचे नियोजन करण्यात आले असून बालरोग तज्ञांचा कृती दल स्थापला आहे. तसेच म्युकर मायकोसीस शस्त्रक्रियासाठी सोय केली आहे. जिल्हा रुग्‍णालयात चार शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात २९ एप्रिलला सर्वाधीक उच्चांकी रुग्णसंख्या होती. १४०० रुग्ण |ऑक्सीजन बेडवर होते. यादिवशीच्या गरजेच्या तिप्पट म्हणजे शहर आणि जिल्ह्यासाठी सुमारे ४०० मेट्रीक टनापर्यत वाढविण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात सध्याच ६२ प्राथमिक केंद्रासह २६ उप केंद्रात सोय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जि. प.मुख्य कार्यकारी आधिकारी लिना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण माहिती पुस्तिकेचे पालक सचिव आनंद लिमये यांच्या हस्ते अनावरण झाले.



नाशिकला वनभवन

वनविभागाच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या विभागाचे कार्यालय आहे. हे सगळे कामकाज एका छताखाली आणून एक सामूहीक वनभवन उभारले जाणार आहे. त्यावर चर्चा झाली. वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज करण्यापेक्षा एकाच ठिकाणी एकत्रित वनभवन उभाण्यावर चर्चा झाली. प्रशासनातर्फे पोलिस विभागासह विविध विभागांच्या प्रलंबित कामांची माहीती देण्यात आली.


पालक सचिवांचे निर्देश

- एकत्रित कामकाजासाठी वनभवन
- पीक कर्ज वाटपावर लक्ष ठेवावे
- प्रलंबित विषय मार्गी लावावेत.
- रुग्णवाहिकांचा विषय सोडविणार


‘लिमयें‘ना आनंद

नाशिककर असलेल्या लिमये पालक सचिव झाल्यानंतर आज त्यांनी पहिलीच बैठक घेतली. त्यात, शहर-जिल्ह्यातील विकासकामांचा सर्वांगीण आढावा घेतला. रुग्णवाहिका, कोरोना तयारी, वनभवन स्मार्ट सिटीची कामांसह विविध कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पहिलीच बैठक आहे. नाशिकलाच काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद असल्याचे सांगितले.

(Guardian Secretary Instructed to the increase oxygen capacity before the third wave of corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT