Police Arrest google
नाशिक

नाशिक : गुजरात पोलिसांच्या 'त्या' कारवाईची अखेर उकल

विनोद बेदरकर

नाशिक : गुजरात येथील एका गुन्ह्यात बारा वर्षापासून फरार असलेल्या आसारामबापू आश्रमातील एकाला गुजरात पोलिसांनी काल गुरुवारी (ता.२) उचलले. दरम्यान, गुजरात पोलिसांच्या या कारवाईची स्थानीक पोलिसांना काहीच माहीती नसल्याने नाशिकला पंचवटी पोलिस ठाण्यात मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पहाटे गुजरात पोलिसांच्या कारवाईची उकल झाली.

संजीव किशनकिशोर वैद्य (४४) असे अपहरण झाल्याचा व्यक्तीचे नाव आहे. वैद्य गंगापूर रोड येथील आसारामबापू आश्रमात अनेक वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहे. गुजरात येथील एका गुन्ह्यात त्यांचा बारा वर्षापासून तपास सुरु असतांना काल त्यांना नाशिकमधून उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. वैद्य पशू खाद्य खरेदीला आसाराम बापू आश्रमातील एकाच्या अपहरणाचा प्रकार समोर आला. आसाराम बापू आश्रमाचे राजेश चंद्रकुमार डावर (रा. सावरकरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सावरकरनगर येथील आश्रमाचे संचालक संजीव वैद्य हे गुरूवारी (ता.२) दुपारी पंचवटीतील सेवाकुंज भागात आश्रमातील गाईंना पशू खाद्य खरेदी करण्यसाठी पिकअप (एमएच ४८ टी ३०९६) मधून आश्रमात गेले होते. सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात ते खरेदी करीत असतांना इनोव्हा कारमधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना गाठून दमदाटी करीत वाहनात बसवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान मध्यरात्री उशीरा हे अपहरण नसून त्याला अहमदाबादला तेथील पोलिसांनी नेल्याचे पुढे आले आहे. दरम्यान तत्पूर्वी पंचवटी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला त्यानुसार, इनोव्हा कारमधून आलेल्यांनी संचालकास पळवून नेले. . याप्रकरणी दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सबधिताला अहमदाबाद येथे पोलिसांनी तपासाला नेले असल्याचे पुढे आले. सहाजिकच, पोलिसांनी तपासाला नेलेल्या व्यक्तीच्या अपहरणाच्या या गुन्ह्यात पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT