Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : आत्मा तोच परमात्मा किंवा पिंडी तेच ब्रह्मांडी असे आपण म्हणतो. याचा अर्थ असा, की परमेश्वर हा अन्यत्र कुठेही नसून, तो साक्षात आपल्या हृदयात वसलेला आहे.

त्यामुळे सेवेकऱ्यांनी इतरत्र कुठेही फिरत बसण्याऐवजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ याप्रमाणे सेवाकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More guidance to Servants for service work nashik news)

दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी (ता. २०) साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. या वेळी महाराष्ट्रासह दिल्लीतून मोठ्या संख्येने सेवेकरी आले होते. गुरुमाउलींनी पुरुषोत्तम मासासह विविध विषयांवर अत्यंत प्रासादिक मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, की पुरुषोत्तम आणि श्रावण हे दोन्ही मास अधिकाधिक सेवेसाठी आहेत.

पुरुषोत्तम अर्थात अधिक मासात भागवत ग्रंथाचे पारायण करणे, ही सर्वोच्च सेवा मानली जाते. हे महत्त्व ओळखून शनिवारी (ता. २२) होणाऱ्या मासिक महासत्संगाच्या दिवशी सकाळी आठला पुरुषोत्तम पूजनाची अत्युच्च सेवा होणार आहे. त्याशिवाय, पुरुषोत्तम याग आणि संक्षिप्त भागवत ग्रंथाचे सामुदायिक पारायण होईल.

भगवान विष्णूला अधिक मासात प्रिय असलेले ३३ अनारशांचे दान देण्याची प्रथा आहे. तेव्हा सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनाच भगवान श्रीविष्णू मानून दान करावे आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या उपक्रमानंतर २३ ते २९ जुलैदरम्यान गुरुपीठात याज्ञिकी प्रशिक्षण होणार असून, २८ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान भागवत नामसप्ताह आणि निरूपण ही महत्त्वपूर्ण सेवा मर्यादित स्वरूपात होणार आहे. अशा बहुविध सेवा असल्याने सेवेकऱ्यांनी आवडेल त्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

सेवामार्गातर्फे आजवर हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला असून, शनिवारी गुरुपीठात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, तसेच एखाद्या कामासाठी प्रशासनावर अवलंबून राहण्याऐवजी सेवेकऱ्यांनी गाडगे बाबा, तुकडोजी महाराजांची भूमिका स्वीकारून जनहिताचे कार्य करावे, अशी आज्ञा गुरुमाउलींनी केली. सत्संगानंतर सेवेकऱ्यांनी पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT