Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : यंदाही ‘सीडबॉल’ उपक्रम : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumouli Annasaheb More : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे या वर्षी लाखोंच्या संख्येत सीडबॉल तयार करण्यात आले आहेत. लवकरच या सीडबॉलचे बाल सेवेकऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे.

हा उपक्रम गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात असल्याची माहिती बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे समन्वयप्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी दिली. ( Gurumauli Annasaheb More statement about Seed Ball activity nashik news )

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे दर वर्षी महावृक्षारोपणाप्रमाणेच सीडबॉलचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जातो. या उपक्रमामध्ये सेवामार्गाच्या साडेसहा हजारांहून अधिक बालसंस्कार वर्गातील हजारो मुले आनंदाने सहभाग घेतात. वर्षभरात विविध फळांच्या बिया बाल सेवेकरी गोळा करतात आणि पावसाळ्यापूर्वी सीडबॉल तयार करतात.

मातीचे छोटे-छोटे गोळे तयार करून त्यामध्ये बी पेरली जाते. त्यानंतर हे सीडबॉल वाळवले जातात. पावसाळा सुरू झाला, की बीज संस्कार करून अर्थात सीडबॉल पूजन करून माळरान, डोंगरभाग, मोकळ्या जागा आदी ठिकाणी सीडबॉल टाकले जातात.

संपूर्ण पावसाळ्यात हा उपक्रम राबविला जातो. सीडबॉलमधील बियांची रुजवात झाली, की छोटी-छोटी रोपे उगवतात. अशा पद्धतीने सीडबॉलच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धन होते, अशी माहिती सेवामार्गाच्या बालसंस्कार, युवा प्रबोधन व देशविदेश अभियानचे प्रमुख नितीनभाऊ मोरे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेनुसार सीडबॉलप्रमाणेच गणेशमूर्तीमध्येही बी पेरली जाते. या मूर्ती, माती आणि शेणापासून तयार केल्या जातात. मूर्ती तयार करतानाच त्यात बीज टाकले जाते. गणेशमूर्ती कुंडीत विसर्जित करून बीज जमिनीत रुजवायचा संस्कार मुलांना दिला जातो, असे श्री. मोरे यांनी स्पष्ट केले.

एकट्या नाशिकमधील नऊ हजार विद्यार्थ्यांनी गत वर्षी सीडबॉल बनविले होते. या वर्षी संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी मूल्यसंस्काराचे धडे गिरवताना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वपूर्ण कामातही आपले योगदान आनंदाने देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT